Posts

Showing posts from September, 2017

news 27.9.2017 dio buldana

Image
मतदार यादीतील आपल्या नावाची निश्चिती करावी -          जिल्हाधिकारी ·                     दोन ठिकाणी नावे असलेल्या मतदारांनी एकच नाव ठेवावे ·                     जिल्ह्यात 19 सप्टेंबर पर्यंत 35 हजार 123 मतदारांची नोंदणी ·                     जिल्ह्यात एकूण 19 लक्ष 11 हजार 123 मतदारसंख्या बुलडाणा, दि‍ .27 -  राज्य निवडणूक आयोगाकडून  प्राप्त आदेशान्वये जिल्ह्यात मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुर्ननिरीक्षण कार्यक्रम 3 ऑक्टोंबर 2017 ते 5 जानेवारी 2018 पर्यंत राबविण्याचे घोषीत करण्यात आले आहे. या मोहिमेदरम्यान मयत मतदारांची नावे वगळणे, नाव पत्त्यातील चूक दुरूस्त करणे, मतदार यादीतील नावाची निश्चिती करण्यात येणार आहे. तरी मतदारांनी प्रारूप मतदार याद्...

news 25.9.2017 dio buldana

     प्रधानमंत्री पिक विमा योजना नुकसान झाल्यास 48 तासाच्या आत विमा कंपनीला कळविणे आवश्यक 18001030061 टोल फ्री क्रमांकावर नुकसानीची माहिती द्यावी बुलडाणा, दि. 2 5 – शासनाने प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी शेतकऱ्यांना पिकाच्या आर्थिक नुकसानीसाठी विम्याचे कवच प्रदान केले आहे. या खरीप हंगामातही योजनेच्या माध्यमातून सहभागी शेतकऱ्यांना पिकाच्या नुकसानीची मदत मिळणार आहे. त्यासाठी वैयक्तिक स्तरावर पिकांचे नुकसान झाले असल्यास अशा शेतकऱ्यांनी 48 तासाच्या आंत विमा कंपनीला कळवावे. कंपनीचा टोल फ्री क्रमांक 18001030061 उपलब्ध करून देण्यात आला आहे. या क्रमांकावर नुकसानीची माहिती तात्काळ द्यावी. या क्रमांकावर संपर्क न झाल्यास विमा कंपनीचे प्रतिनिधी दिलीप लहाने यांच्या  9881017458 क्रमांकावर कळवावे.     त्याचप्रमाणे संबंधित तालुक्याचे तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडे विहीत नमुन्यातील पिक सुचना अर्ज शेतकऱ्यांनी भरून द्यावे. सदर अर्ज भरणे अनिवार्य आहे. सद्यस्थितीमध्ये जिल्ह्यात उडीद पिकाची काढणीपश्चात नुकसान होत असल्याचे निदर्शनास येत आहे. शेतकऱ्या...

news 22.9.2017 dio buldana

Image
ग्राहक संरक्षण हितासाठी काम करावे -           जिल्हाधिकारी ·          जिल्हा ग्राहक संरक्षण समिती बैठक बुलडाणा,दि.   22   :     ग्राहकांना विविध समस्या भेडसावत असतात. शासनाच्या विविध विभागांच्या माध्यमातून ग्राहकांना सेवा देण्यात येतात. अनेकवेळा या सेवा देताना तक्रारी येतात. ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करून आलेल्य तक्रारी सोडविल्या पाहिजे. त्यासाठी ग्राहक संरक्षण परिषद व शासनाच्या विविध विभागांनी काम करावे, अशा सूचना प्र. अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद देशमुख यांनी आज दिल्या.     जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात ग्राहक संरक्षण परिषदेच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी तक्रारींवर सुनावणी करताना ते बोलत होते. यावेळी बीएसएनएलचे श्री. रजोरीया, महावितरणे कार्यकारी अभियंता श्री. पाठक आदींसह अमरचंद संचेती, श्री. बैरागी, संजय जोशी, जिवनसिंग राजपूत आदी सदस्य उपस्थित होते.    प्रत्येक विभागाने तक्रारींचा निपटारा त्वरित करून तक्रारदाराचे समाध...

news 21.9.2017 dio buldana

सुलतानपूर गावसमूहाचा विकास करण्यासाठी समन्वयाने काम करा -          जिल्हाधिकारी ·         रूरअर्बन मिशनची बैठक, गावसमूहात 13 गावांचा समावेश बुलडाणा, दि.   21   :   शामा प्रसाद मुखर्जी रूरअर्बन मिशन अंतर्गत बुलडाणा जिल्ह्यात लोणार तालुक्यातील सुलतानपूर गावसमूहाची निवड करण्यात आली आहे. या मिशन अंतर्गत निवडलेल्या गावसमूहामध्ये पायाभूत सोयी सुविधा, विकासाची कामे मोठ्या प्रमाणावर केल्या जाणार आहे. सुलतानूपर गावसमूहात 13 गावे असून या सर्व गावांचा सर्वांगिण विकास करण्यात येणार आहे. यामध्ये अंतर्भूत असेलल्या सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केल्या आहेत.    जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शामाप्रसाद मुखर्जी रूरअर्बन मिशनच्या नियामक समितीची बैठक आज 21  सप्टेंबर 2017 रोजी पार पडली. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. याप्रसंगी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राहुल साकोरे, नगर रचनाकार ए. के जोशी, कार्यकारी अभियंत...

loan weiver news 19.9.2017 dio buldana

Image
कर्जमाफी अर्जामध्ये शेतकऱ्यांनी सर्व बँकाकडील कर्जाची माहिती देणे अनिवार्य -      सर्व शेती कर्जाची माहिती न दिल्यास अर्ज होणार अपात्र -      नव्याने अर्ज न भरताच जुन्या अर्जात एडीट ऑप्शनमधून माहिती द्यावी बुलडाणा, दि   19   :    छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना 2017 अंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येत आहे. या योजनेतंर्गत अर्ज भरण्याची शेवटची मुदत 22 सप्टेंबर 2017 असून अंतिम मुदतीची प्रतिक्षा न करता शेतकऱ्यांनी अर्ज भरावे. मात्र कर्जमाफी अर्जामध्ये सर्व बँकाकडील शेती कर्जाची माहिती देणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी विविध बँकांचे शेती कर्ज काढलेले आहे, त्यांनी सर्व बँक कर्ज खात्यांची माहिती अर्जात भरणे अत्यावश्यक आहे. यामध्ये जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचाही समावेश आहे. माहिती न भरल्यास असे अर्ज कर्जमाफीसाठी अपात्र ठरणार आहे.    अशी माहिती   भरण्यासाठी शेतकऱ्यांना नव्याने अर्ज भरण्याची गरज नसून त्याच अर्जामध्ये एडीट ऑप्शनद्वारे ही माहिती भरावी. अर्ज सादर करताना सर्व थकीत खातेदारांनी जिल्हा मध्...

NEWS 16.9.2017 DIO BULDANA

कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी 22 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ अर्ज भरण्यासाठी शेवटच्या दिवसाची प्रतीक्षा करू नये      बुलडाणा,दि‍ . 16 - : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 अंतर्गत कर्जमाफीचे ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी राज्य शासनाने 7 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. या योजनेतंर्गत शेवटची तारिख 15 सप्टेंबर 2017 होती. ती आता 22 सप्टेंबर 2017 पर्यंत वाढविण्यात आली आहे. जिल्ह्यात तालुका अथवा ग्रामपातळीवर 1892 केंद्र सुरू आहेत. त्यामध्ये आपले सरकार, महा ई सेवा केंद्र  यांचा समावेश आहे.   शेतकऱ्यांनी शेवटच्या दिवसाची प्रतीक्षा न करता अर्ज भरावे. आपल्या जवळच्या शासनमान्य आपले सरकार, महा ई सेवा केंद्र, ई संग्राम केंद्रांवर जावून कर्जमाफीचा अर्ज भरावा. त्यासाठी आधार कार्ड, पॅन क्रमांक, बँक बचत खातेपुस्तिका, 7/12 उतारा व आधार क्रमांकाशी जोडलेला मोबाईल क्रमांक आदी कागदपत्रे सोबत घेवून जावीत. अर्ज न भरलेल्या शेतकऱ्यांनी त्वरित ऑनलाईन अर्ज भरावेत, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी केले आहे.         ...

football festival news 12.9.2017, dio buldana

Image
कर्जमाफीचे अर्ज न भरलेल्या शेतकऱ्यांनी त्वरित अर्ज भरावे -       जिल्हाधिकारी •       15 सप्टेंबर 2017 पर्यंत मुदत •       अर्ज भरण्यासाठी उरले थोडे दिवस.. •       कर्जमाफीमध्ये ऑनलाईन नाव पाहण्यासाठी http://CSMSSY.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी बुलडाणा, दि. 12 : राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेतंर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे. या योजनेनुसार 15 सप्टेंबर 2017 पर्यंत कर्जमाफीचे अर्ज ऑनलाईन भरण्याची मुदत आहे. तरी ज्या शेतकऱ्यांनी अर्ज भरलेले नसतील, अशा शेतकऱ्यांनी त्वरित ग्रा.पं. आपले सरकार *सेवा केंद्र, महा ई सेवा केंद्र, सीएससी केंद्रांच्या* माध्यमातून अर्ज भरून घ्यावे. मुदत संपत असल्याने उर्वरित शेतकऱ्यांनी अर्ज भरावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले आहे.     जिल्ह्यात 1210 केंद्रांवर बायोमॅट्रीक यंत्र उपलब्ध करण्यात आले आहे. या केंद्रांवरून विनाशुल्क शेतकऱ्यांचे अर्ज भरून घेण्यात येत...