जिल्ह्यातील विकास कामे गतीने पूर्ण करा - पालकमंत्री पांडुरंग फुंडकर

जिल्ह्यातील विकास कामे गतीने पूर्ण करा - पालकमंत्री पांडुरंग फुंडकर * विविध विषयांचा पालकमंत्री यांनी घेतला आढावा * कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या बँकांनी प्रसिद्ध कराव्या * निधीचा पूर्णपणे विनियोग करावा बुलडाणा , दि. 30 - जिल्ह्यामध्ये विकासाची कामे मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत. या कामांमुळे जिल्हा विकास वाटेवर अग्रेसर होणार आहे. राष्ट्रीय महामार्गांच्या निर्मिती कामांचा त्यामध्ये प्रामुख्याने समावेश आहे. जी कामे सुरु आहेत ती गतीने पूर्ण करावी आणि जी सुरु करण्यात येणारी आहेत , ती त्वरित सुरु करावी , अशा सूचना पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात विविध विषयांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आढा...