news 26.9.16 dio buldana
जिल्ह्यातील 1551 पात्र कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी · जिल्हास्तरीय समितीकडून 2 कोटी 90 लक्ष रूपयांच्या प्रस्तावांना मान्यता · 755 शेतकऱ्यांना गहाण वस्तु परत मिळाल्या बुलडाणा, दि 26 - शेतकऱ्यांसमोर बदलत्या हवामानाचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. हवामान बदलामुळे पीक पद्धतीत बदल करून हवामानाशी सुसंगत पीक घेण्यासाठी शेतकरी सज्ज आहे. मात्र कर्ज हा त्याच्यासमोरचा मोठा प्रश्न असून कर्जामुळे शेतकरी मेटाकुटीस येत असल्याचा अनुभव आहे. शासनाने विदर्भ व मराठवाड्यामधील परवानाधारक सावकारांचे कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांना व्याजासह कर्जमाफी दिली आहे. या दिलासा देणाऱ्या निर्णयामुळे निश्चितच जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. खरोखरच शासनाने दिलेली कर्जमाफी...