Posts

Showing posts from August, 2024

DIO BULDANA NEWS 29.08.2024

Image
  युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील उमेदवारांना नियुक्ती पत्र प्रदान बुलडाणा, दि. 29   :   मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजेनेंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजेनेत जिल्ह्यातील 18-35 वयोगटातील उमेदवारांची डाटा एन्ट्री ऑपरेटर, क्लर्क ट्रेनी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरविकास विभागात निवड करण्यात आली आहे. या निवड झालेल्या उमेदवारांना जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी नगर विकास विभागाचे जिल्हा सहआयुक्त गंगाधर पेंटे, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग गोपाल चव्हाण उपस्थित होते. 00000

DIO BULDANA NEWS 28.08.2024

  बॅटरी संचालित फवारणी यंत्र, कापूस साठवणूक बॅगच्या अर्जासाठी मुदतवाढ   बुलडाणा,(जिमाका),दि.28  :   राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया पिकांची उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन २०२४-२५ योजनेंतर्गत प्रकल्पाचा लाभ घेण्याकरिता दि. 31 ऑगस्ट २०२४ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याबाबत शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले. परंतु शेतकऱ्यांना अर्ज करताना शेतकऱ्यांना अडचणी आल्याने ते अर्ज करू शकले नाहीत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. यासाठी   mahadbt.maharashtra. gov.in/Farmer   या पोर्टलवर शेतकऱ्यांनी अर्ज करावे, अधिक माहितीसाठी कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी  ए.टी. सुरडकर  यांनी केले आहे.            ******* सोमवारी   लोकशाही   दिनाचे आयोजन   बुलडाणा,(जिमाका),दि.28  :   दर महिन...

DIO BULDANA NEWS 27.08.2024

  खामगाव मुलींच्या वसतिगृहाच्या वृत्तात तथ्य नाही *समाजकल्याण विभागाचा खुलासा बुलडाणा, दि. 27 : खामगाव येथील वसतिगृहात पुरुष गृहपाल असल्याचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे. या वृत्तात कोणतेही तथ्य नाही, त्यामुळे याबाबत समाज कल्याण विभागाने खुलासा केला आहे. समाज कल्याण कार्यालयाच्या अधिनस्त मागासवर्गीय मुलींची 8 शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत. यापैकी 2 वसतिगृहावर नियमित महिला गृहपाल कार्यरत आहे. उर्वरित 6 वसतिगृहावर कनिष्ठ लिपिक वर्गीय महिला गृहपाल कार्यरत आहे. सदर वसतिगृहावर नियमित महिला गृहपाल अद्यापपर्यंत भरलेले नसल्याने ही पदे रिक्त आहेत. खामगाव येथील मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहामध्ये नियमित महिला गृहपाल नसल्याने सदर वसतिगृहाचा तात्पुरता प्रभार खामगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहाच्या नियमित पुरुष गृहपाल डी. बी. बोथिंगे यांच्याकडे सोपविण्यात आला. याबाबत सुरज बेलोकार, रा. खामगाव यांच्या तक्रारीनुसार महिला चौकशी समितीतर्फे मुलींच्या वसतिगृहाची चौकशी करण्यात आली. सदर चौकशी समितीच्या अहवालानुसार काहीही तथ्य नसल्याचे निदर्शनास आले आहे. तक्रारीच्...

DIO BULDANA NEWS 26.08.2024

Image
जिल्ह्यात 627 एकरवर तुतीची लागवड बुलडाणा, दि. 26 : चालु वर्षात जिल्ह्यातील 523 शेतकऱ्यांनी 627 एकरवर तुती लागवडीसाठी नोंदणी केली आहे. तुती लागवड करुन रेशीम उत्पादन करण्यासाठी शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. मनरेगा अंतर्गत 335 एकर आणि उर्वरीत 290 क्षेत्रावर सिल्क समग्र-2 या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत तुती लागवडीसाठी नोंदणी झाली आहे. यावर्षी आतापर्यंत 200 एकर क्षेत्रावर तुती लागवड पुर्ण झाली आहे.   शासनाकडून रेशीम शेतीचे महत्व पटवून दिले जात आहे. त्यामुळे शेतकरी रेशीम शेतीकडे वळत आहे. राज्यात सन 2021-22 मध्ये तुती लागवडीखाली असलेले 14 हजार 905 हेक्टर क्षेत्र सन 2023-24 मध्ये 18 हजार 607 हेक्टरवर पोहोचले आहे. यात सुमारे 3 हजार 702 हेक्टरने वाढ झाली आहे. आधुनिक पद्धतीने शेती करण्याकडे अनेक शेतकरी वळत आहेत. सिंचनाची सुविधा असलेले शेतकरी विविध प्रयोग करून अधिक उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करीत आहे. पारंपारीक पिकासोबतच तुती लागवड करण्याबाबत शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याची क्षमता असलेला रेशीम उत्पादन हा कृषी आधारीत अद्योग आहे. तुती रेशीम विकास कार्...

DIO BULDANA NEWS 24.08.2024

Image
  जिल्हा न्यायालयाच्या कोनशिलेचे अनावरण बुलडाणा, दि. 24 : जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी जिल्हा न्यायालयाच्या आवारात कोनशिलेचे अनावरण केले. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय, नागपूर खंडपीठाचे मुख्य प्रशासकीय न्यायमूर्ती नितीन सांबरे, औरंगाबाद मुख्य प्रशासकीय न्यायमूर्ती रवींद्र घुगे, न्यायमूर्ती विनय जोशी, न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फलके, न्यायमूर्ती अविनाश घारोटे, न्यायमूर्ती अनिल किलोर, न्यायमूर्ती     श्री. सुर्यवंशी, न्यायमूर्ती श्री. खोब्रागडे, जिल्हा व सत्र न्यायाधिश स्वप्नील खटी यांच्यासह वकील संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमापूर्वी न्यायमूर्ती श्री. गवई यांना पोलिस दलातर्फे मानवंदना देण्यात आली. दरम्यान देऊळगाव राजा येथील न्यायाधीश शैलशे कंठे यांचे निधन झाले. त्यामुळे सहकार विद्या मंदिर येथे आयोजित कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रम रद्द करण्यात आला. न्यायाधीश श्री. खटी यांनी शोक स...

DIO BULDANA NEWS 23.08.2024

  जिल्ह्यातील तरुणांना जर्मनीत रोजगाराची संधी बुलडाणा, दि. 23 : जिल्ह्यातील तरुणांना जर्मनीमध्ये कुशल आणि अकुशल रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी त्यांना प्रशिक्षित करुन सक्षम बनविण्यासाठी राज्य शासन जर्मनी सिस्टर स्टेट रिलेशनशीप अंतर्गत पथदर्शी प्रकल्प राबविणार आहे. यात युवकांना प्रशिक्षित करुन जर्मनीत रोजगाराची संधी उपलब्ध करून देणार आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, तसेच माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने जर्मन भाषा प्रशिक्षण, तसेच कौशल्य वृद्धी उपक्रम राबविणार असल्याची माहिती जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. जगराम भटकर यांनी पत्रपरिषदेत दिली. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी वरिष्ठ अधिव्याख्याता मारोती गायकवाड, शिक्षण विस्तार अधिकारी वैशाली उबरहंडे उपस्थित होते. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, शालेय शिक्षण व क्रिडा विभागाच्या वतीने हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या जर्मन भाषा प्रकल्पाची माहिती, प्रचार व संकल्पना तरुणांपर्यंत पोहचून जर्मनीत विविध कौशल्याधारीत रोजगार संधी बाबत माहिती दिली. तसेच शासनाच्या पथद...

DIO BULDANA NEWS 22.08.2024

  जिल्हा कारागृहात रक्षाबंधन साजरा बुलडाणा, दि. 22 : विविध सेवाभावी संस्थेतर्फे जिल्हा कारागृहात रक्षाबंधन साजरा करण्यात आला. कारागृहातील बंद्यांकरीता धार्मिक, सामाजिक, मनोरंजनात्मक, समुपदेशपर उपक्रम राबविण्यात येतात. या दृष्टिकोनातून दि. 19 ऑगस्ट रोजी कारागृहातील बंद्यांकरीता बुलडाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटी, बुलडाणा यांच्यातर्फे रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी बंद्यांना फळवाटप करण्यात आले. यावेळी कारागृह अधीक्षक संदीप भुतेकर, तुरुंगाधिकारी मोहन पाटील, बुलडाणा अर्बन चॅरिटेबल सोयायटीचे मुख्य कार्यकरी अधिकारी डॉ. सुकेश झंवर, प्रशासकीय अधिकारी नम्रता पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी कृषी सहायक गजानन सांगळे, लिपिक अपर्णा आघाव, सुभेदार दरेसिंग चव्हाण, हवालदार सुनील धाकडे, संजय मदारकर, कारागृह शिपाई जितेश काळवाघे, दिनेश डोंगरदिवे, सुमंता राजपूत, वैभव राणे, चंद्रकांत महाले, शिवदास शिंदे, आनंद पवार, संदिप राजपूत, दिपक वाघ, करण सुलाने यांनी पुढाकार घेतला. 00000000

DIO BULDANA NEWS 21.08.2024

Image
  गणेशोत्सव स्पर्धेत मंडळांनी सहभाग नोंदवावा *जिल्हा नियोजन अधिकारी यांचे आवाहन बुलडाणा, दि. 21 : यावर्षीही सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य प्रशासनाकडून पुरस्कार देण्यात येणार आहे. यात सन 2024 या वर्षीच्या सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत मंडळांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. यावर्षी दि. 7 सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरु होत आहे. राज्यस्तरीय निवड समितीकडे जिल्हास्तरीय निवड समितीने केलेल्या 44 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपैकी 3 विजेत्या गणेशोत्सव मंडळाना वगळून इतर 41 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय विजेत्या मंडळाला 25 हजारांचा पुरस्कार देण्यात येणार आहे. राज्यातील पहिल्या 3 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना अनुक्रमे रु. 5 लाख रुपये, 2.5 लाख रुपये, 1 लाख रुपये पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पु. ल. देशपांडे सभागृह, मुंबई यांच्या  mahotsav.plda@gmail.com  या इ-मेल स्पर्धेचे परिपूर्ण अर्ज दि. 31 ऑगस्ट पूर्वी सादर करावेत. सदर पुरस्कारासाठी निव...

DIO BULDANA NEWS 20.08.2024

Image
  जिल्हाधिकारी कार्यालयात सद्‌भावना दिनाची शपथ बुलडाणा, दि. 20 : सद्भावना दिवसानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात शपथ देण्यात आली. यावेळी नायब तहलिसदार श्याम उमाळे यांनी शपथ दिली. यावेळी नायब तहसिलदार विजय हिवाळे, किशोर हटकर, अवल कारकून शिला पाल, अपेक्षा इंगळे, वर्षा मुळे आदी उपस्थित होते. उपस्थितांना सामाजिक एकोपा, सौहार्द ठेवण्याची शपथ देण्यात आली. 00000 उद्योजकांसाठी डिजिटल लोन, बीज प्रक्रियेविषयी कार्यशाळा बुलडाणा, दि. 20 : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे रॅम्प प्रोजेक्ट अंतर्गत महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ, मुंबई आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने उद्योजकांसाठी डिजिटल लोन अप्लिकेशन आणि फायनान्शियल नॉलेजबाबत दोन दिवसीय, तसेच बीज प्रक्रियेबाबत पाच दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. कार्यशाळेत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या क्षमता आणि स्पर्धात्मकता वाढवणे यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सदर कार्यशाळा नि:शुल्क असून कार्यशाळेमध्ये तज्‍ज्ञ व्यक्तींद्वारे मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रशिक्षण नोंदणी दि. 24 ऑगस्ट 2024 पर्यंत गणेश गुप...