देऊळगांव राजा येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन 21.3.18
राखीव प्रवर्गामधून निवडून आलेल्या उमेदवारांनी त्रुटींची पुर्तता करावी जात वैधता प्रमाणपत्र कार्यालयाचे आवाहन अनुसूचित जाती 1950 , विजाभज 1961, इमाव व विमाप्र 1967 पूर्वीचा पुरावा असावा बुलडाणा , दि.21 : जिल्ह्यात ऑक्टोंबर, नोव्हेंबर व डिसेंबर 2017 मध्ये ग्रामपंचायतींच्या निवडणूका झाल्या. या निवडणूकांमध्ये आरक्षीत जागांवर राखीव प्रवर्गामधील उमेदवार निवडून आले. अशा उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्राकरीता प्रकरणे जात वैधता प्रमाणपत्र कार्यालयाकडे सादर केली आहे. मात्र या प्रकरणांमध्ये कागदपत्रांया त्रुटींची पुर्तता केलेली नसल्याने जात वैधता प्रमाणपत्र अशा उमेदवारांना निर्गमित करणे गैरसोयीचे झाले आहे. तरी जात प्रमाणपत्र पडताळणी अधिनियम, महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याचे पडतळणीचे विनियमन) अधिनियम 2000 आणि जाती पडताळणी नियमावली 2012 चे कलम 17 नुसार विहीत मुदतीत त्रुटींची पुर्तता करणे आवश्यक आहे. उमेदवारांच्या जातीचे दाव्यानु...