आजपासून इयत्ता 12 वीच्या परीक्षेला सुरूवात..!
आजपासून इयत्ता 12 वीच्या परीक्षेला सुरूवात..! कॉपीसाठी मदत करणाऱ्यांविरूद्ध फौजदारी परीक्षा केंद्र परीसरात 144 कलम संबधित विषयाच्या शिक्षकांनी पंचायत समिती कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक बुलडाणा,दि . 20 : उच्च माध्यमिक शालांत परीक्षा अर्थातच इयत्ता 12 वी ची परीक्षा उद्या 21 फेब्रुवारी 2018 पासून सुरू होत आहे. या परीक्षेचा पहिला पेपर इंग्रजी विषयाचा असून परीक्षा 20 मार्च 2018 पर्यंत चालणार आहे. परीक्षा सुरळीत व कॉपीमुक्त वातावरणामध्ये होण्यासाठी व विद्यार्थ्यांना पेपर लिहण्यासाठी भयमुक्त, शांत वातावरण राहण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. ज्या विषयाचा पेपर असेल त्या विषयाचे शिक्षक परीक्षा केंद्राचे परीसरात उपस्थित राहणार नाही. संबधित विषय शिक्षकांनी आपले पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी कार्यालयात पेपरचे अर्धा तास अगोदर ते पेपर संपल्यानंतर अर्धा तास पर्यंतच्या कालावधीमध्ये पुर्णवेळ उपस्थित रहावे लागणार आहे. सर्व गटशिक्षणाधिकारी यांनी याबाबत कार्यवाही करावयाची आहे. पेपर सुरू असलेल्या विषयाचा किंवा कोणताही विषय शिक्षक परीक्षा केंद्राचे आ...