Posts

Showing posts from December, 2017

जिल्ह्यातील विकास कामे गतीने पूर्ण करा - पालकमंत्री पांडुरंग फुंडकर

Image
जिल्ह्यातील विकास कामे गतीने पूर्ण करा                                                  - पालकमंत्री पांडुरंग फुंडकर * विविध विषयांचा पालकमंत्री यांनी घेतला आढावा * कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या बँकांनी प्रसिद्ध कराव्या * निधीचा पूर्णपणे विनियोग करावा बुलडाणा , दि. 30 - जिल्ह्यामध्ये विकासाची कामे मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत. या कामांमुळे जिल्हा विकास वाटेवर अग्रेसर होणार आहे. राष्ट्रीय महामार्गांच्या निर्मिती कामांचा त्यामध्ये प्रामुख्याने समावेश आहे. जी कामे सुरु आहेत ती गतीने पूर्ण करावी आणि जी सुरु करण्यात येणारी आहेत , ती त्वरित सुरु करावी , अशा सूचना पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज दिल्या.   जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात विविध विषयांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आढा...

जिगांवसह 8 लघु प्रकल्पांच्या कामांचा कार्यान्वीतीकरणाच शुभारंभ

·         * नांदुरा येथे 17 डिसेंबर रोजी कार्यक्रमाचे आयोजन ·        *  बळीराजा जलसंजीवनी योजना बुलडाणा, दि. 14: राज्यात निधीअभावी रखडलेल्या 21 मुख्य व 83 लघु अशा एकूण 104 प्रकल्पांची कामे आता शासनाच्या बळीराजा जलसंजीवनी योजनेत पुर्ण होणार आहे. राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त व दुष्काळग्रस्त 14 जिल्ह्यातील प्रकल्पांचा यामध्ये समावेश आहे. त्यामध्ये विदर्भातील रखडलेल्या 81 प्रकल्पांचा समावेश आहे.  या योजनेतंर्गत जिल्हयातील जिगांवसह 8 लघु प्रकल्पांसाठी अनुदान मिळणार आहे. या योजनेच्या कार्यान्वितीकरण अर्थातच कार्यान्वयन कामाचा शुभारंभ 17 डिसेंबर 2017 रोजी नांदुरा येथे होणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन 17 डिसेंबर 2017 रोजी सकाळी 11 वाजता कोठारी विद्यालयाचे प्रांगणात करण्यात आले आहे. प्रकल्पांचे कार्यान्वीतीकरण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय भुपृष्ठ परिवहन, जलसंधारण आणि गंगा शुद्धीकरण विभागाचे मंत्री नितीन गडकरी असणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत राज्याचे कृषी त...

buldana loan wevier news 12.12.2017 dio buldana

जिल्ह्यात 2 लक्ष 22 हजार  30 9  शेतकरी  कर्जमाफीसाठी पात्र.. ! छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना उर्वरित शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू बुलडाणा,  दि .   12   :    छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थातच ऐतिहासिक कर्जमाफी योजनेतंर्गत जिल्ह्यातील 2 लक्ष 22 हजार 309 शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर प्राप्त याद्यांची छाननी करण्यात आली. छाननीनंतर पात्र शेतकऱ्यांच्या ग्रीन याद्या बँकांना पाठविण्यात आल्या. या ग्रीन यादीत जिल्ह्यामध्ये 2 लक्ष 22 हजार 309 शेतकरी पात्र असून  यामधील 1 लाख 80 हजार 786 शेतकऱ्यांना सरसकट दीड लाखापर्यंतची कर्जमाफी देण्यात आली आहे. तसेच  ( ओटीएस )  एकरकमी योजनेतंर्गत 41 हजार 518 शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली आहे. अशाप्रकारे एकरकमी व सरसकट कर्जमाफी याप्रमाणे जिल्ह्यात 2 लक्ष 22 हजार 309  शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र आहेत. त्याचप्रमाणे जिल्ह्यात प्रोत्साहनपर अनुदानही देण्यात आले आहे.      या योजनेतं...

news 4.12.2017 io buldana

Image
         परिस्थितीवर मात करीत ‘विशालची’ भरारी…! ·         सावळी येथील विशाल नरवाडे बनला आयपीएस   बुलडाणा, दि. 4 : मध्यमवर्गीय कुटूंब.. वडील चांडोळ येथील पशुवैद्यकीय दवाखाना येथे कार्यरत.. तसेच आई सुरूवातीला अंगणवाडी शिक्षीका आणी नंतर गृहीणी.. अशी बेताची परिस्थिती.. कुटूंब अजूनही धाड येथे भाड्याच्या घरात राहणारे.. मात्र नोकरी करीत गुंतवणूक तर करायची.. ही तेजराव नरवाडे यांची इच्छा.. आणि गुंतवणूक केली ती शिक्षणामध्ये.. मुलगी व मुलगा विशाल असे छोटे कुटूंब असणाऱ्या तेजराव यांनी मुलीला स्त्रीरोगतज्ज्ञ केले तर विशालला आयआयटी जबलपूर येथून अभियंता बनविले. मात्र प्रशासनात जावून समाजाची सेवा करावी..ही उर्मी विशालला स्वस्थ बसू देत नव्हती. विशालने आयआयटी झाल्यानंतर लाखो रूपयांच्या पगाराची खाजगी नोकरी न पत्करता दिल्ली गाठले. दिल्ली गाठताच आयपीएस होण्याचा अभ्यास सुरू केला. विशालचे मूळ गांव बुलडाणा तालुक्यातील सावळी.     स्पर्धा परीक्षा..प्रशासकीय सेवेत जावून समाजाची सेवा करण्याचा मार्ग. या मार्गाने जाणाऱ्या प्र...

news 2.12.2017 dio buldana

 मुख आरोग्य हे शारिरीक स्वास्थ्याचे गमक                                                     -  जिल्हाधिकारी * मुख आरोग्य तपासणी मोहिमेचे उद्घाटन * 31 डिसेंबर 2017 पर्यंत चालणार मोहिम        बुलडाणा, दि. 2 :   मुख आरोग्य सांभाळले पाहिजे. मुख स्वास्थ्‌य हे पुष्कळच्या आजारांपासून आपले संरक्षण करते. अनेक आजार मुख दुर्गंधी असल्यामुळे निर्माण होतात. अशा आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी मुख आरोग्य महत्वाचे आहे. स्वच्छ श्वास हे स्वच्छ शरीराचे प्रतिक आहे.  त्यामुळे मुख आरोग्य हे चांगल्या शरीर स्वास्थ्‌याचे गमक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज केले. मुख स्वास्थ्य तपासणी मोहिमेचचा उद्घाटनीय कार्यक्रम जिल्हा सामान्य रूग्णालय येथे नुकताच पार पडला. त्यावेळी ...