Posts

Showing posts from April, 2017

news 27.4.2017 DIO BULDANA

पंतप्रधान कृषि सिंचन योजनेतंर्गत सुक्ष्म सिंचन संचासाठी ‘ई ठिबक’प्रणाली ·          1 मे 2017 पासून ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया सुरू ·         www.mahaethibak.gov.in   या संकेतस्थळावर अर्ज करावे ·         विविध टप्प्यावरील कार्यवाहीची माहिती एसएमएसद्वारे मिळणार बुलडाणा, दि‍ .27 – पंतप्रधान कृषि सिंचन योजनेतंर्गत सुक्ष्म सिंचन योजना 2017-18 या वर्षाकरीता सुक्ष्म सिंचन संच बसविण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे व शेतकऱ्यांकडून अर्ज स्वीकृती करणे याकरीता ई-ठिबक आज्ञावली विकसित करण्यात आली आहे. ही आज्ञावली 1 मे 2017 पासून सुरू होत असून या आज्ञावलीवर शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करण्यास व शेतकऱ्यांकडून अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. ही आज्ञावली 1 मे 2017 ते 31 डिसेंबर 2017 पर्यंत सुरू राहणार आहे.    शेतकऱ्यांकडून सुक्ष्म सिंचन संचासाठी अर्ज केवळ www.mahaethibak.gov.in   या संकेतस्थळावरच स्वीकारण्यात येणार आहे. ई-ठिबक आज्ञावलीवर शेतकरी नोंदणीसाठी लाभार्थ्याचा आधार...

news 12.4.2017 dio buldana

पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांचा दौरा बुलडाणा , दि . 12 :  जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर गुरूवार, दि. 13 एप्रिल 2017 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे : दि. 13 एप्रिल 2017 रोजी सकाळी 5.28 वाजता शेगांव येथे आगमन व मोटारीने खामगांवकडे प्रयाण, सकाळी 6 वाजता खामगांव येथे आगमन, राखीव व मुक्काम असेल.                                                                         *** डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहनिमित्त रक्तदान शिबिर बुलडाणा दि‍. 12- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहनिमित्त 8 ते 14 एप्रिल 2017 दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या सप्ता...

news 11.4.2017 dio buldana

जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन बुलडाणा दि‍. 11- जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच यावेळी उपस्थित सिंदखेड राजाचे आमदार डॉ. शशीकांत खेडेकर यांनीही महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले. याप्रसंगी जिल्हा नियोजन अधिकारी दिपक सिडाम, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र टापरे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी श्री. खांदे, तहसीलदार श्री. काळे आदींसह अधिकारी उपस्थित होते.  ****** परिवहन कार्यालयाची तब्बल 111.72 टक्के महसूल वसूली 40 कोटी उद्दिष्टापेक्षा 44.97 कोटी रूपयांच्या महसूलाची वसूली 73 चालक परवान्यावर निलंबनाची कार्यवाही जिल्ह्यात 36 हजार 118 नवीन वाहनांची नोंदणी 45 हजार 117 नवीन चालक परवाने बुलडाणा, दि. 11 :- सन 2016-17 या आर्थकि वर्षात बुलडाणा परिवहन कार्यालयाने धडाकेबाज कामगिरी करीत महसूल वसूलीच्या उद्दिष्टापैकी तब्बल 111.72 टक्के वसूली केली आहे. त्यामु...