news 29.11.2016 dio buldana
वृक्ष लागवडीसाठी उपलब्ध जमिनीची माहिती द्यावी - जिल्हाधिकारी · वृक्ष लागवड मोहिम यशस्वी करावी · यावर्षी जिल्ह्याला 10.54 लक्ष वृक्षारोपणाचे उद्दिष्ट बुलडाणा, दि. 29 : यावर्षी 1 जुलै रोजी सर्वांनी हिरीरीने सहभाग घेवून मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड मोहिम यशस्वी केली होती. त्यानुसार पुढील वर्षामध्ये सुद्धा आपणाला समन्वयाने वृक्ष लागवड मोहिम यशस्वी करायची आहे. यावर्षी जिल्ह्याला 10.54 लक्ष वृक्षलागवडीचे उद्दिष्ट मिळाले असून राज्यभर 4 कोटी वृक्षारोपण करावयाचे आहे. त्याकरिता प्रत्येक विभागाने आपल्याकडे वृक्षारोपणासाठी उपलब्ध असलेल्या जमिनीची माहिती तात्काळ सादर करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे यांनी केल्या आहेत. वृक्षलागवडी बाबत बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आले होते. त्यावेळी आढावा घेताना जिल्हाधिकारी बोलत होते. याप्रसंगी जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती दिपा मुधोळ, नि...