news 28.12.2016 dio buldana
बांधकाम सुरू असलेल्या मालकांनी विना रॉयल्टीची रेती घेवू नये · जिल्हाधिकारी यांचे आवाहन बुलडाणा, दि.28 - बांधकाम सुरू असलेल्या घर मालकांनी रॉयल्टी नसलेली रेती घेवू नये. रॉयल्टीची तपासणी महसूल यंत्रणेच्या संबंधीत अधिकारी किंवा कर्मचारी, तलाठी यांच्याकडून करावी. अशाप्रकारे रेती खरेदी थांबल्यास चोरीची रेती विक्री करणाऱ्यांची धाडस वाढणार नाही. त्यासाठी बांधकाम सुरू असलेल्या मालकांनी रॉयल्टीची रेती घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे यांनी केले आहे. तहसीलदार यांनी बांधकाम सुरू असलेल्या स्थळी भेट देवून मालकाकडून रेती रॉयल्टीची घेत असल्याची खातरजमा करावी अन्यथा रेती जप्त करावी. रेती घाटांवर सीसीटीव्ही बसविण्यात आले असून सीसीटीव्हीचे एक महिन्याचे फुटेज सांभाळून ठेवावे. या फुटेजमध्ये रेतीची चोरी करीत असल्याचे आढळल्यास त्या इसमावर एफआयआर दाखल करावा. पोलीसांनी चोरीची रेती वाहतूक करणारी वाहने पकडून पेालीस स्टेशनला जमा करावे. वाहन आरटीओ यांच्या ताब्यात द्यावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले आहे. ******* अपंग...