देऊळगाव राजा आयटीआयमधील निकामी साहित्याचा लिलाव; ४ नोव्हेंबरपर्यंत निविदा सादर करण्याचे आवाहन
बुलढाणा, दि. २३ (जिमाका) : संत चोखामेळा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
(आयटीआय), देऊळगाव राजा येथील वापरून निकामी, निरुपयोगी व कालबाह्य झालेली यंत्रसामुग्री,
हत्यारे आणि अवजारे विक्रीसाठी लिलावाद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी
संस्थेच्या वतीने इच्छुकांकडून सीलबंद निविदा मागविण्यात आल्या आहेत.
सदर
साहित्याची यादी तसेच प्रत्यक्ष साहित्य पाहण्यासाठी १९ ऑक्टोबर २०२६ पासून कार्यालयीन
वेळेत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. इच्छुकांना निविदेच्या अटी व शर्ती संस्थेच्या
कार्यालयात पाहता येतील. निविदा अर्जाची किंमत १०० रुपये असून, ही रक्कम रोखीने भरून
अर्ज प्राप्त करता येणार आहे. इच्छुकांनी आपली मोहरबंद निविदा संस्थेच्या कार्यालयातील
निविदा पेटीत ४ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत जमा करावी. निर्धारित मुदतीनंतर
प्राप्त होणाऱ्या निविदा स्वीकारल्या जाणार नाहीत.
सदर
साहित्याच्या संख्येत कमी-अधिक बदल करण्याचा तसेच कोणतीही निविदा स्वीकारण्याचा अथवा
नाकारण्याचा अधिकार संस्थेचे प्राचार्य यांनी राखून ठेवला आहे. इच्छुकांनी विहित मुदतीत
निविदा सादर कराव्यात, असे आवाहन संत चोखामेळा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, देऊळगाव
राजा, जिल्हा बुलढाणा यांच्या वतीने करण्यात आले आहे.
00000
Comments
Post a Comment