रोहणा व पिंपळगाव राजा येथे CPHC प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न; ‘सेवा संकल्प’ अभियानांतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन

 




 

बुलढाणा, दि. १६ (जिमाका) : राज्य शासनाच्या ‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ व ‘सेवा संकल्प’ अभियानांतर्गत या महत्त्वाकांक्षी अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत खामगाव तालुक्यातील रोहणा व पिंपळगाव राजा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये १५ व १६ ऑक्टोबर रोजी सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा (CPHC) विषयावरील दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.

 

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजीत मंडाले यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. मिलिंद जाधव, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी निलेश जाधव, जिल्हा प्रशिक्षण केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहा नलावडे आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिलाष खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

 

कार्यशाळेला वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी (CHO), आरोग्य सेवक-सेविका, गटप्रवर्तक आणि आशा समन्वयक यांनी सहभाग नोंदविला. प्रशिक्षणादरम्यान सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा, समुदायस्तरीय आरोग्य व्यवस्थापन, आरोग्यविषयक जनजागृती, प्रभावी गृहभेटीचे तंत्र आणि आरोग्याच्या १३ सेवांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

 

डॉ. शैलेश खंडारे, डॉ. अंजली उजवने, डॉ. पंकज राठोड, डॉ. मंगल राठोड, डॉ. सचिन भांगे, डॉ. मिलिंद वानखेडे, डॉ. संतोष सांगळे, डॉ. शिवानंद शिंगाडे, डॉ. संतोष साबळे, डॉ. सचिन खेडेकर, डॉ. सागर जाधव आणि डॉ. प्रवीण मुंडे यांच्यासह अन्य प्रशिक्षकांनी विविध आरोग्यविषयक विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच आरोग्य सहाय्यिका कविता खाडे, स्वाती शेंद्रे, कमल पदमने, सुवर्णा बेलसरे आणि आरोग्य सेविका सुनीता जवंजाळ व सुलोचना पहाड यांनी प्रशिक्षण प्रक्रियेत महत्त्वपूर्ण योगदान दिले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रीती राजगुरू,  सुनील लोखंडे उपस्थित होते.

 

गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा गावपातळीवर पोहोचविण्यावर भर

या प्रशिक्षणातून समुदायाच्या आरोग्यविषयक गरजा ओळखणे, प्रभावी गृहभेटींद्वारे नागरिकांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे, प्रतिबंधात्मक व आरोग्यवर्धक सेवांना प्रोत्साहन देणे आणि आरोग्यविषयक जनजागृती अधिक प्रभावी करण्यावर भर देण्यात आला.

 

‘सुदृढ गाव, निरोगी समाज आणि प्रत्येक नागरिकापर्यंत गुणवत्तापूर्ण प्राथमिक आरोग्यसेवा’ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अशा प्रशिक्षण कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढविण्यासह ‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी या प्रशिक्षणाचा उपयोग होणार आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या