मागास बहुजन कल्याण विभागाच्या योजनांसाठी १० ऑक्टोबरपर्यंत अर्जाची मुदत
बुलढाणा,
दि. 6 (जिमाका) : इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी
इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी
विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांसाठी ऑनलाइन पोर्टलवर आधार प्रमाणीकरण पूर्ण
न झाल्याने तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाइनऐवजी ऑफलाइन
पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन विभागाने केले आहे.
विद्यार्थ्यांनी
आपले ऑफलाइन अर्ज इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, बुलढाणा येथे सादर करावेत. जिल्ह्याच्या
ठिकाणी महाविद्यालयात प्रवेशित विद्यार्थ्यांनी वसतिगृह योजनेसाठी अर्ज करणे अनिवार्य
आहे. तालुकास्तरावरील महाविद्यालयांमध्ये NT-C प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी ‘स्वयम्’
योजनेसाठी, तर OBC, VJNT आणि SBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई
फुले आधार’ योजनेसाठी अर्ज करावा, असे कळविण्यात आले आहे.
अर्ज
प्रक्रिया सुरळीत होईपर्यंत विद्यार्थ्यांनी ऑफलाइन अर्ज करावेत. अर्ज करताना अडचण
आल्यास सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, बुलढाणा जिल्हा कार्यालय, सामाजिक
न्याय भवन, त्रिशरण चौक, बुलढाणा येथे संपर्क साधावा. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत
१० ऑक्टोबर २०२६ असून, विद्यार्थ्यांनी मुदतीपूर्वी अर्ज सादर करण्याचे आवाहन सहाय्यक
संचालक दत्तात्रय वायाळ यांनी केले आहे.
0000
Comments
Post a Comment