16 व 17 रोजी दोन दिवसीय ग्रंथोत्सव; ग्रंथविक्री, प्रदर्शनी व विविध बहुरंगी कार्यक्रमाचे आयोजन
बुलडाणा, (जिमाका) दि. 13 : जिल्हा ग्रंथालय
अधिकारी कार्यालयातर्फे दि. 16 आणि 17 ऑक्टोंबर 2026 रोजी दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे
आयोजन करण्यात आले आहे. गर्दे वाचनालयाच्या सभागृहातील या ग्रंथोत्सवात वाचन संस्कृतीचा
प्रचार आणि प्रसार होण्यासाठी ग्रंथप्रदर्शन, ग्रंथविक्री, कविसंमेलन, व्याख्याने,
तसेच विविध बहुरंगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार,
दि. 16 ऑक्टोंबर रोजी सकाळी 10 वाजता हुतात्मा स्मारकापासून गर्दे वाचनालयापर्यंत ग्रंथदिंडी
काढण्यात येणार आहे. मुख्याधिकारी गणेश पांडे यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे उद्घाटन होणार
आहे. यावेळी शिक्षणाधिकारी अनिल आकाळ, सहायक माहिती अधिकारी सतिश बगमारे, गर्दे वाचनालयाचे
अध्यक्ष गोकुल शर्मा उपस्थित राहतील.
सकाळी
11 वाजता उद्घाटन समारंभ जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी जेष्ठ साहित्यिक रमेश इंगळे उत्रादकर, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात,
जिल्हा पोलिस अधिक्षक निलेश तांबे, ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर आदी उपस्थित राहणार
आहेत.
दुपारी
2.30 ते 3.30 वाजेदरम्यान ‘लेखन वाचन संवाद’ मध्ये लेखक सुभाष किन्होळकर, कवी समीक्षक तथा प्रकाशक
रविद्र साळवे सहभागी होतील. तर दुपारी 3.30 ते 5 वाजेदरम्यान कृत्रीम बुद्धिमता, डिजिटल
ग्रंथालय व ई-संसाधने या विषयावर डॉ. निलेश
गावंडे, डॉ. श्रीकांत पाटील व डॉ. रविंद्र सरोदे सहभागी होतील.
ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी दि. 17 ऑक्टोंबर
रोजी सकाळी 11 वाजता पहिला सत्रात ‘मी जिजाऊ बोलतो’ या एकपात्री प्रयोग अकोट येथील हर्षदा इंदाने सादर
करतील. दुपारी 11.30 ते 2 वाजेदरम्यान ‘मराठी, लोक व ज्ञान भाषा व्हावी’
या विषयावर प्रा. कमलेश खिल्लारे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद. यामध्ये प्रमुख वक्ते
डॉ. प्रदीप बारळ, विनायक वरणगावकर, मधुकर वडोदे, किरण डोंगरदिवे व महेंद्र बोर्डे सहभागी
होणार आहे.
दुपारी 3 ते 4.30 वाजता रमेश आराख यांच्या अध्यक्षतेखाली
‘कविसंमेलन आणि गझल’. यामध्ये गोविंद रहाटे, सुरेश इंगळे, वैशाली तायडे,
विशाल खोंदले सहभागी होतील.
दोन दिवशीय
ग्रंथोत्सवाला जिल्ह्यातील ग्रंथालय कर्मचारी आणि पदाधिकारी तसेच नागरिकांनी कार्यक्रमास
आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. अ.पु. वानखडे यांनी
केले आहे.
00000

Comments
Post a Comment