ऊती संवर्धन प्रयोगशाळा स्थापनेसाठी अनुदान; सार्वजनिक व खासगी क्षेत्राला संधी

 


बुलढाणा, दि. ५ (जिमाका) : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन २०२६-२७ अंतर्गत नवीन ऊती संवर्धन (Tissue Culture Lab) प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी अनुदान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ सार्वजनिक तसेच खासगी क्षेत्रातील संस्थांना घेता येणार आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील कृषी विद्यापीठे, शासन अंगीकृत संस्था तसेच इतर शासकीय संस्थांना नवीन ऊती संवर्धन प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी प्रकल्पाच्या १०० टक्के खर्चाच्या मर्यादेत, जास्तीत जास्त २ कोटी ५० लाख रुपयांपर्यंत अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रयोगशाळेने उपलब्ध निर्मिती तंत्रज्ञानाच्या आधारे मान्यता असलेल्या पिकांची किमान २५ लाख रोपे उत्पादित करणे आवश्यक आहे.

खासगी क्षेत्रातील नवीन ऊती संवर्धन प्रयोगशाळांसाठी प्रकल्प खर्चाच्या ४० टक्के मर्यादेत, जास्तीत जास्त १ कोटी रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. संबंधित प्रकल्प हा बँक कर्जाशी निगडित असणे आवश्यक असून, प्रयोगशाळेने मान्यता असलेल्या पिकांची किमान २५ लाख रोपे उत्पादित करणे बंधनकारक आहे.

अनुदानासाठी पात्र ऊती संवर्धन प्रयोगशाळेला जैवतंत्रज्ञान विभागाच्या मानके व निकषांनुसार अनुदान मिळाल्यापासून १८ महिन्यांच्या आत मानांकन प्रमाणपत्र मिळविणे आवश्यक राहणार आहे. इच्छुकांनी महाडीबीटी पोर्टलवर फलोत्पादन घटकांतर्गत नवीन ऊती संवर्धन प्रयोगशाळा स्थापनेसाठी अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संबंधित नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या