दिव्यांग प्रमाणपत्रासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संपर्क साधावा
बुलढाणा, दि. 07 (जिमाका) : जिल्हा रुग्णालय, बुलढाणा येथे दिव्यांग व्यक्तींच्या
तपासणीसाठी दर महिन्यातील प्रत्येक बुधवार व शुक्रवार दिव्यांग बोर्ड घेण्यात येत होता.
परंतु सहसंचालक,आरोग्य सेवा रुग्णालय यांच्या सूचनेनुसार जिल्हा रुग्णालयातील दिव्यांग
प्रमाणपत्र वितरण प्रणाली बंद करण्यात आली असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांकडे
ऑनलाइन आयडी व पासवर्ड उपलब्ध करून देण्यात आले असून दिव्यांग व्यक्तीनी वैद्यकीय महाविद्यालय
व रुग्णालयांकडे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केले आहे.
राजमाता जिजाऊ शासकीय
वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय, बुलढाणा यांना ऑनलाइन आयडी व पासवर्ड उपलब्ध
झाल्याने दिव्यांग प्रमाणपत्र वितरण प्रणाली सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा
रुग्णालयातील दि. 19 ऑक्टोबर 2026 पासून प्रत्येक
बुधवार व शुक्रवार सुरू असलेली संबंधित दिव्यांग तपासणी बोर्ड पूर्णपणे बंद करण्यात
येत आहे.
दिव्यांग व्यक्तींनी
दिव्यांग तपासणी व दिव्यांग प्रमाणपत्रासाठी राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
व रुग्णालय, बुलढाणा प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
00000
Comments
Post a Comment