सेवा संकल्प अभियानांतर्गत वरवट बकाल येथे आरोग्य तपासणी ; तिशीचा पल्ला – तपासणी आणि सल्ला उपक्रमातून ८८ रुग्णांची तपासणी*

*सेवा संकल्प अभियानांतर्गत वरवट बकाल येथे आरोग्य तपासणी ; तिशीचा पल्ला – तपासणी आणि सल्ला उपक्रमातून ८८ रुग्णांची तपासणी*

*बुलढाणा, दि. 3 (जिमाका) :* सेवा संकल्प अभियान तसेच ‘माझे गाव आरोग्यसंपन्न गाव’ उपक्रमांतर्गत आरोग्य वर्धिनी उपकेंद्र, वरवट बकाल येथे ‘तिशीचा पल्ला – तपासणी आणि सल्ला’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ८८  रुग्णांच्या  असंसर्गजन्य आजारांची (NCD) तपासणी करण्यात आली.

उपक्रमांतर्गत उच्च रक्तदाब, मधुमेह आदी असंसर्गजन्य आजारांचे प्रतिबंध, वेळेवर निदान आणि उपचाराबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. तपासणीदरम्यान उच्च रक्तदाबाचे ४, मधुमेहाचे १ आणि उच्च रक्तदाब व मधुमेह दोन्हीचे १ नवीन रुग्ण आढळून आले. तसेच ४८ नागरिकांचे तोंडाच्या कर्करोगाचे, तर ३३ महिलांचे स्तनाच्या कर्करोगाचे स्क्रीनिंग करण्यात आले. या दोन्ही तपासण्यांमध्ये संशयित रुग्ण आढळून आले नाहीत. एका नागरिकामध्ये मोतीबिंदू आढळून आला.

नागरिकांना नियमित आरोग्य तपासणी, संतुलित आहार, नियमित व्यायाम, तंबाखूमुक्त जीवनशैली आणि वैयक्तिक आरोग्याची काळजी घेण्याबाबत समुपदेशन करण्यात आले. असंसर्गजन्य आजारांचे लवकर निदान करून त्यावर वेळीच उपचार घेणे तसेच निरोगी जीवनशैलीचा अवलंब करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समुदाय आरोग्य अधिकारी प्रणाली सोनवणे, एएनएम शीला वाघोदे, गटप्रवर्तक उज्ज्वला वानखडे तसेच आशा सेविकांनी सहभाग घेतला.
00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या