हतेडी बु. येथे राष्ट्रीय पोषण माह कार्यक्रम उत्साहात संपन्न पौष्टिक आहाराच्या विविध पाककृतींचे प्रदर्शन; प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेबाबत जनजागृती

 





 

बुलढाणा, दि. १० (जिमाका) : एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प, बुलढाणा कार्यालयाच्या वतीने नवव्या राष्ट्रीय पोषण माह अंतर्गत हतेडी बु. येथे दि. ८ ऑक्टोबर रोजी विविध उपक्रमांसह पोषण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

 

या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, प्रकल्प संचालक श्री. म्हस्के, जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद येन्डोले, गटविकास अधिकारी अमिता गावडे, बुलढाणा बालविकास प्रकल्प अधिकारी संदीप गवळी, मोताळा बालविकास प्रकल्प अधिकारी श्री. सय्यद, बुलढाणा येथील एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे विस्तार अधिकारी गणेश शिंदे, पर्यवेक्षिका सुषमा लांभाडे यांच्यासह सर्व पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि हतेडी बु. येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

 

कार्यक्रमात अंगणवाडी सेविकांनी तयार केलेल्या विविध पौष्टिक पाककृतींचे प्रदर्शन भरविण्यात आले. यामध्ये पूरक पोषण आहार (THR) पासून तयार केलेल्या पाककृती, रानभाज्या आणि फळभाज्यांपासून बनविलेल्या विविध पदार्थांचा समावेश होता. स्थानिक व पौष्टिक खाद्यपदार्थांचा दैनंदिन आहारात समावेश करण्याचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले. तसेच प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेची माहिती देऊन योजनेच्या लाभांबाबत जनजागृती करण्यात आली.

 

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी हतेडी बु.चे माजी सरपंच श्रीकृष्ण भाऊ आणि ग्रामपंचायत अधिकारी श्री. जाधव यांचे विशेष सहकार्य लाभले.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या