मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त जिल्हा ग्रंथालयात ग्रंथ प्रदर्शन

 




 

बुलढाणा, दि. 6 (जिमाका) : मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे औचित्य साधून जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, बुलढाणा येथे आज मराठी भाषा, साहित्य आणि वाचन संस्कृतीच्या प्रसारासाठी ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.

 

या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा कोषागार कार्यालयाचे उपकोषागार अधिकारी रामकिसन गीते,  कनिष्ठ लेखापाल शिवनारायण बारगजे, यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. प्रदर्शनात विविध विषयांवरील मराठी साहित्य, कथा-कादंबऱ्या, चरित्रे, आत्मचरित्रे, स्पर्धा परीक्षा, इतिहास, सामाजिक व शैक्षणिक विषयांवरील पुस्तके तसेच विविध ज्ञानवर्धक ग्रंथ मांडण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी ग्रंथ प्रदर्शनाची पाहणी करून विविध पुस्तकांची माहिती घेतली.

 

यावेळी मराठी भाषेचा प्रचार-प्रसार, वाचनाची आवड निर्माण करणे आणि नागरिकांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्याचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. नव्या पिढीने अधिकाधिक मराठी पुस्तके वाचून वाचन संस्कृती समृद्ध करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास गव्हाळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन अजय शिरसाठ यांनी मानले. ग्रंथ प्रदर्शनाच्या माध्यमातून नागरिक, विद्यार्थी आणि वाचकांना विविध विषयांवरील दर्जेदार साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले. या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या