मनसगाव येथे 'सेवा संकल्प अभियान' अंतर्गत भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

 



बुलढाणा, दि. 13 (जिमाका) : प्राथमिक आरोग्य केंद्र आडसुळ अंतर्गत येणाऱ्या मनसगाव येथे दि. १२ ऑक्टोबर रोजी 'सेवा संकल्प अभियान' यशस्वीरीत्या राबविण्यात आले. या अभियानांतर्गत गावात भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

सदर शिबिर वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज जमाव व वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. शिबिरामध्ये ग्रामस्थांची रक्तदाब तपासणी (BP Check-up), मधुमेह तपासणी (Sugar Check-up), ईसीजी (ECG Check-up) आणि हिमोग्लोबिन (HB Check-up) तपासणी मोफत करण्यात आली. या तपासण्यांमुळे अनेक ग्रामस्थांना आपल्या आरोग्याविषयी वेळेवर मार्गदर्शन लाभले.

या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. यावेळी: समुदाय आरोग्य अधिकारी सागर कोगदे,आरोग्य निरीक्षक विजय हिंगणे, ईसीजी तंत्रज्ञ (ECG Technician) पवन सहस्त्रबुद्धे, आरोग्यसेविका मनिषा करणकार, सपना सोळंके, आरोग्य सेवक निलेश देशमुख, ज्ञानेश्वर महाले, शुभम दुधे यांच्यासह आशा गटप्रवर्तक, स्थानिक आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आणि अर्धवेळ परिचर प्रमुख उपस्थित होत्या.

ग्रामीण भागातील नागरिकांना गावातच दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी या उद्देशाने आयोजित केलेल्या या शिबिराला मनसगाव व परिसरातील ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या