महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी मतदारयादीत नाव शोधण्याचे आवाहन*
*महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी मतदारयादीत नाव शोधण्याचे आवाहन*
*बुलढाणा दि. १९ -* महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातील मतदारांनी मतदार यादीत आपले नाव आहे, याची ऑनलाइन पद्धतीने पडताळणी करावी, असे आवाहन अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त श्रीमती नयना गुंडे यांनी केले आहे.
मतदारांना घरबसल्या आपले नाव शोधता यावे, यासाठी mahaelection.gov.in या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मतदारांनी Google वर mahaelection.gov.in हे संकेतस्थळ उघडून Electoral Registration या पर्यायामध्ये जावे. त्यानंतर Graduate किंवा Teachers यापैकी संबंधित Teachers मतदारसंघाची निवड करून आपले नाव शोधता येईल.
नाव शोधण्यासाठी Acknowledgement Number, Current Roll, Final Roll तसेच District–Taluka–Name अशा विविध पर्यायांचा वापर करता येतो.
Acknowledgement Number उपलब्ध नसल्यास जिल्हा, तालुका आणि मतदाराचे नाव टाकूनही शोध घेता येतो. यासाठी आवश्यक कॅप्चा भरल्यानंतर Search केल्यास संबंधित मतदाराची नोंद, मतदान केंद्र तसेच इतर तपशील दिसून येतात.
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची अंतिम मतदार यादी व त्यानंतरची पूरक मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असल्याने, त्यानंतर मतदारांनी पुन्हा एकदा आपले नाव आणि मतदान केंद्राची माहिती तपासून घेणे आवश्यक आहे. पूरक यादीमुळे पत्ता अथवा भाग क्रमांकामध्ये बदल होण्याची शक्यता असल्याने अंतिमतः प्रसिद्ध झालेल्या यादीतील तपशीलाची खात्री करावी.
मतदारांनी आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करून मतदानकेंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
---०००---
Comments
Post a Comment