सेवा संकल्प अभियानांतर्गत कारंजा चौकात विशेष महिला आरोग्य तपासणी शिबिर; गरोदर माता, किशोरवयीन मुली व महिलांची तज्ज्ञांकडून तपासणी


 


बुलढाणा, दि. 07 (जिमाका) : ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र, कारंजा चौक येथे दि. 6 ऑक्टोंबर रोजी  विशेष महिला आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. मनीषा चव्हाण यांनी गरोदर मातांची तपासणी करून आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन केले.

यावेळी अति जोखमीच्या गरोदर माता, किशोरवयीन मुली तसेच महिलांमध्ये आढळणाऱ्या विविध आरोग्य समस्यांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान आढळलेल्या आरोग्यविषयक समस्यांनुसार महिलांना आवश्यक समुपदेशन, औषधोपचार व पुढील उपचाराबाबत मार्गदर्शन देण्यात आले.

महिलांच्या आरोग्यविषयक समस्या वेळेत ओळखून त्यांना तज्ज्ञ वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे, तसेच महिलांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती निर्माण करणे, हा शिबिराचा प्रमुख उद्देश होता. विशेषतः गरोदर माता व अति जोखमीच्या गरोदर मातांच्या आरोग्याकडे लक्ष देत आवश्यक तपासण्या करण्यात आल्या.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. ‘सेवा संकल्प—निरोगी महिला, सुदृढ कुटुंब’ या संदेशातून महिला आरोग्य संवर्धनाचा संकल्प यावेळी अधोरेखित करण्यात आला.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या