कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजनेअंतर्गत ९.६६ हेक्टर जमीन वाटपासाठी निवड
बुलढाणा, दि. ५
(जिमाका) : महाराष्ट्र
शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील भूमिहीन लाभार्थ्यांना
१०० टक्के अनुदानावर शेतजमीन उपलब्ध करून देण्यासाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण
व स्वाभिमान योजना राबविण्यात येत आहे.
या योजनेंतर्गत खामगाव तालुक्यातील मौजे ढोरपगाव येथे शासनाने
खरेदी केलेली एकूण ९.६६ हेक्टर जमीन लाभार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे. शासन निर्णयातील
तरतुदीनुसार संबंधित गावातील ग्रामसेवक व तलाठी यांच्यामार्फत प्राप्त भूमिहीन व गरीब
लाभार्थ्यांच्या यादीतून एकूण सहा लाभार्थ्यांची जमीन वाटपासाठी निवड करण्यात आली आहे.
या
निवडीबाबत अनुसूचित जातीच्या भूमिहीन लाभार्थ्यांना काही आक्षेप असल्यास त्यांनी आपले
आक्षेप दि. ९ ऑक्टोबर २०२६ पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग, बुलढाणा यांच्या
कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
0000
Comments
Post a Comment