*सेवा संकल्प अभियानांतर्गत खैरा येथे आरोग्य तपासणी व उपचार शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद**सुमारे ७५ नागरिकांची आरोग्य तपासणी; ग्रामस्थांचा मोठा सहभाग*


*सेवा संकल्प अभियानांतर्गत खैरा येथे आरोग्य तपासणी व उपचार शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद*

*सुमारे ७५ नागरिकांची आरोग्य तपासणी; ग्रामस्थांचा मोठा सहभाग*

*बुलढाणा, दि. ३ (जिमाका) :* संकल्प सेवा अभियानांतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, खैरा येथे नागरिकांच्या आरोग्याची तपासणी व आवश्यक उपचाराच्या उद्देशाने आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. बुलढाणा येथील डॉ. अभिलाष माळी (MBBS, MS – General Surgery) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

शिबिरादरम्यान गावातील सुमारे ७५ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. विविध आरोग्यविषयक तक्रारींबाबत नागरिकांची तपासणी करून आवश्यक मार्गदर्शन व उपचार करण्यात आले. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.

यावेळी डॉ. अभिलाष माळी यांचा सत्कार डॉ. अनंत मापारी यांच्या हस्ते, तर रविंद्र सूर्यवंशी यांचा सत्कार श्री. लहुजी गावंडे यांच्या हस्ते करण्यात आला.

गावातील नागरिकांना त्यांच्या परिसरातच आरोग्य तपासणी व उपचाराची सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या या उपक्रमाचे ग्रामस्थांनी स्वागत केले. शिबिराला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा आरोग्यविषयक जनजागृती आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला.
0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या