अरकचेरी ल.पा. तलावात मत्स्यव्यवसाय संस्थेच्या नोंदणीसाठी हरकती व आक्षेप आमंत्रित

 


बुलढाणा, दि. 13 (जिमाका) : बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील अरकचेरी बु. ल.पा. योजना (१४८.६७ हेक्टर) तलाव हा लघुपाटबंधारे विभाग, बुलढाणा यांच्याकडून मत्स्यव्यवसाय विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. शासनाच्या सुधारित तलाव/जलाशय धोरणानुसार, तालुक्यातील स्थानिक मच्छीमारांना समान संधी उपलब्ध करून देण्याच्या हेतूने मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

या धोरणांतर्गत, नियोजित जय निषादराज मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था मर्या., खेळद बु., पो. काटेल कोलद, ता. संग्रामपूर, जि. बुलढाणा. यांचा प्रस्तावित मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेकडून नावाची आरक्षणता आणि बँक खाते उघडण्याबाबतचा प्रस्ताव कार्यालयाला प्राप्त झाला आहे. नैसर्गिक न्याय तत्त्वाने आणि पारदर्शकतेसाठी या प्रस्तावावर १५ दिवसांच्या आत सार्वजनिक हरकती व आक्षेप मागवण्यात येत आहेत.

ज्या घटकांना किंवा व्यक्तींना या प्रस्तावाबाबत काही आक्षेप असल्यास त्यांनी ठरवून दिलेल्या मुदतीत आपले म्हणणे मांडणे आवश्यक आहे. मुदतीत प्राप्त झालेल्या हरकतींवर कायदेशीर सुनावणी घेऊन पुढील योग्य ती कारवाई केली जाईल. १५ दिवसांनंतर प्राप्त झालेल्या कोणत्याही हरकती किंवा आक्षेपांचा विचार केला जाणार नाही, याची संबंधित सर्व मच्छीमारांनी नोंद घ्यावी, असे सुभाष मो. राठोड (सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध), बुलढाणा) यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या