एकही पात्र मतदार मतदार यादीतून वगळला जाणार नाही**विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत राज्यभर मतदान केंद्रांवर विशेष मोहीम; मतदारांच्या तक्रारींसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज*

*एकही पात्र मतदार मतदार यादीतून वगळला जाणार नाही*

*विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत राज्यभर मतदान केंद्रांवर विशेष मोहीम; मतदारांच्या तक्रारींसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज*

*बुलढाणा, दि. १२ (जिमाका) :* भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या सर्व विधानसभा मतदारसंघांच्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये नावांचा समावेश करणे, नावे वगळणे तसेच नोंदींमध्ये आवश्यक दुरुस्ती करण्याची कार्यवाही सुरू आहे. राज्यातील एकही पात्र मतदार मतदार यादीतून वगळला जाणार नाही, याची सुनिश्चिती करण्यासाठी निवडणूक प्रशासन वचनबद्ध असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

*राज्यातील १ लाख २५ हजार मतदान केंद्रांवर विशेष मोहीम*

मतदार यादीच्या पुनरीक्षण प्रक्रियेत नागरिकांना सहभागी होता यावे, यासाठी राज्यातील १ लाख २५ हजार मतदान केंद्रांवर शनिवार, दि. ३ ऑक्टोबर, रविवार, दि. ४ ऑक्टोबर, शनिवार, दि. १० ऑक्टोबर आणि रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६ रोजी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.

तसेच, नवमतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी राज्यातील प्रत्येक महाविद्यालय आणि विद्यापीठामध्ये दि. ५ ते ९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत पाच दिवसांची विशेष नोंदणी शिबिरे आयोजित करण्यात आली होती. या माध्यमातून पात्र नवमतदारांना नोंदणीची संधी उपलब्ध करून देण्यात आली.

*मतदारांच्या तक्रारींसाठी अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन*

मतदार नोंदणीच्या संदर्भात कोणतीही तक्रार अथवा अडचण असल्यास नागरिकांनी संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO), सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (AERO), मतदार नोंदणी अधिकारी (ERO) किंवा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

यासाठी राज्यात १ लाख २५ हजार मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, ७ हजार १०० सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, २८८ मतदार नोंदणी अधिकारी आणि ३६ जिल्हा निवडणूक अधिकारी यांची यंत्रणा कार्यरत आहे.

मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, नोंदींमधील त्रुटी दुरुस्त करणे किंवा आवश्यक बदल करून घेण्यासाठी नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पुनरीक्षण प्रक्रियेत सहकार्य करावे. प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी मतदार यादीतील नोंदी अचूक व अद्ययावत ठेवण्यावर भर देण्यात येत आहे.

“मतदार यादीतून एकही पात्र मतदार वगळला जाणार नाही, याची सुनिश्चिती करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत,” असे मुख्य निवडणूक कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या