इतर मागास बहुजन विभागाच्या विविध योजनांसाठी ऑफलाईन अर्ज मागविले
बुलढाणा, दि. 14 (जिमाका) :
इतर मागास
बहुजन कल्याण विभागामार्फत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इतर मागास वर्ग, विमुक्त जाती,
भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबविण्यात
येत आहेत. या योजनाचा लाभ घेतांनी विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणी येत असल्याने विद्यार्थ्यांकडून
ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे.
शासकीय वसतिगृह, 'पंडित
दीनदयाळ उपाध्याय स्वयंम' योजना आणि 'ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार' योजना यांच्या
ऑनलाइन पोर्टलवर सध्या आधार प्रमाणीकरण (Aadhaar Authentication) पूर्ण न होणे व इतर
तांत्रिक अडचणी येत आहेत. ऑनलाइन अर्ज भरताना विद्यार्थ्यांना येणाऱ्या या तांत्रिक
अडचणींमुळे कोणताही पात्र विद्यार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी ऑनलाइन
प्रक्रिया पूर्णपणे सुरळीत होईपर्यंत विद्यार्थ्यांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचे
निर्देश देण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या सूचना
व मार्गदर्शक तत्वे: जिल्ह्याच्या ठिकाणी महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी
शासकीय वसतिगृह योजनेसाठी अर्ज करणे अनिवार्य आहे. तालुकास्तरावरील महाविद्यालयात प्रवेशित
NT-C प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी 'स्वयंम योजने'साठी अर्ज करावा. तालुकास्तरावरील
महाविद्यालयात प्रवेशित OBC, VJNT आणि SBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी 'ज्ञानज्योती
सावित्रीबाई फुले आधार योजने'साठी अर्ज करावा.
अर्ज कोठे सादर करावा व अंतिम मुदत:
विद्यार्थ्यांनी आपले ऑफलाइन अर्ज 'इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, बुलढाणा' येथे
सादर करावेत. ऑफलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३० ऑक्टोबर २०२६ पर्यंत आहे. अर्ज
करताना किंवा अर्ज प्रक्रियेसंदर्भात कोणतीही अडचण आल्यास विद्यार्थ्यांनी सहायक संचालक,
इतर मागास बहुजन कल्याण, बुलढाणा जिल्हा कार्यालय, सामाजिक न्याय भवन, त्रिशरण चौक,
बुलढाणा येथे संपर्क साधावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक
दत्तात्रय वाघ यांनी केले आहे.
0000
Comments
Post a Comment