सेवा संकल्प अभियानातून धानोरा येथे विवाह व मृत्यू प्रमाणपत्रांचे वाटप*

*सेवा संकल्प अभियानातून धानोरा येथे विवाह व मृत्यू प्रमाणपत्रांचे वाटप*

*बुलढाणा, दि. 4 (जिमाका) :* सेवा संकल्प अभियानांतर्गत ग्रामपंचायत धानोरा (वि.) यांच्या वतीने ग्रामस्थांना आवश्यक नागरी कागदपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच मृत्यू प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमामुळे संबंधित लाभार्थ्यांना आवश्यक प्रमाणपत्रे स्थानिक पातळीवर उपलब्ध झाली असून, विविध शासकीय योजना व प्रशासकीय कामकाजासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे सुलभ झाले आहे. ग्रामपंचायतीमार्फत नागरिकांना विविध नागरी सेवा अधिक गतिमान व सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत आहे.

सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून शासनाच्या विविध सेवा नागरिकांपर्यंत थेट पोहोचविण्यात येत असून, ग्रामस्थांनी या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या