सेवा संकल्प अभियान’अंतर्गत नारायणखेड येथे बालकांच्या आरोग्य व पोषणाबाबत जनजागृती

 



 

बुलढाणा, दि. ८ (जिमाका) : आयुष्यमान आरोग्य मंदिर, डिग्रस बु. अंतर्गत नारायणखेड येथे दि. ७ ऑक्टोबर रोजी नियमित आरोग्य सेवा सत्रासह वेलनेस ॲक्टिव्हिटी घेण्यात आली. आरोग्य सेवा संकल्प अभियान, ‘माझा गाव–आरोग्य संपन्न गाव’ तसेच ‘तिशीचा पल्ला–तपासणी व सल्ला’ अभियानांतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला.

 

यावेळी अंगणवाडीमध्ये अन्नप्राशन दिन साजरा करण्यात आला. ९ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर या कालावधीच्या अनुषंगाने लाभार्थी बालकांच्या पालकांना सहा महिन्यांनंतर पूरक आहाराची सुरुवात, सकस व संतुलित आहार, स्तनपानाचे महत्त्व, स्वच्छता व हात धुणे, बालकांची वाढ व विकास तसेच नियमित लसीकरणाबाबत आरोग्य शिक्षण व मार्गदर्शन करण्यात आले.

 

नियमित आरोग्य सेवा सत्रात बालकांची आरोग्य तपासणी, वजन व वाढीचे निरीक्षण तसेच लसीकरणाची स्थिती तपासण्यात आली. बालकांना वयानुसार पौष्टिक व विविध आहार देणे, स्वच्छतेची काळजी घेणे आणि आरोग्यविषयक समस्या आढळल्यास तातडीने आरोग्य कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन पालकांना करण्यात आले.

 

या उपक्रमास समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका व अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. उपक्रमाच्या माध्यमातून बालकांचे पोषण, आरोग्य, वाढ आणि सर्वांगीण विकास याबाबत पालकांमध्ये जनजागृती करण्यात आली.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या