प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्यास २६ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ अंतिम मतदार यादी मात्र १६ नोव्हेंबरलाच प्रसिद्ध होणार
बुलढाणा
दि. 13 (जिमाका): मतदार यादीच्या
विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत ३१ ऑगस्ट, २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार
यादीसाठी दावे व हरकती सादर करण्याच्या मुदतीत भारत निवडणूक आयोगाने पुन्हा वाढ केली
आहे. त्यानुसार, आता नागरिकांना २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत दावे व हरकती दाखल करता येणार
आहेत. अंतिम मतदार यादी मात्र पूर्वीच्या वेळापत्रकानुसार १६ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध
करण्यात येणार आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक कार्यालय यांनी दिली आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या सुधारित वेळापत्रकानुसार,
दावे व हरकती सादर करण्याचा २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत सादर करता येतील. तसेच नोटीस टप्पा
आणि दावे व हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया १० नोव्हेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात
येणार आहे. त्यानंतर १६ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.
मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, नोंदींमध्ये दुरुस्ती
करणे तसेच आवश्यकतेनुसार हरकती दाखल करण्यासाठी ही मुदतवाढ महत्वाची आहे. त्यामुळे
पात्र नागरिकांनी या वाढीव मुदतीचा लाभ घेऊन आपले दावे व हरकती विहित वेळेत सादर करावेत,
असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी केले आहे.
0000
Comments
Post a Comment