'Train-to-Trainer' उपक्रमांतर्गत बुलढाण्यातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
बुलढाणा, दि. 14 (जिमाका) : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे यांच्या
वतीने बुलढाणा जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये 'अमृत वर्ग' तसेच 'Train-to-Trainer' उपक्रमाचे
नियोजन व आयोजन करण्यात आले
या उपक्रमाच्या अनुषंगाने, राज्यस्तरीय
जबाबदारी सोपवण्यात आलेले कैलास कुलकर्ते सर यांनी
बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी
अमृत वर्ग घेतले
या उपक्रमासाठी अमृत संस्थेचे बुलढाणा
जिल्हा व्यवस्थापक जिग्रेश कमानी आणि नंदाकिशोर मगर उपस्थित होते
विद्यार्थ्यांपर्यंत शासकीय योजनांची
माहिती, मार्गदर्शनपर उपक्रम आणि व्यक्तिमत्त्व विकासाच्या संधी पोहोचविण्यासाठी अमृत
संस्थेमार्फत असे उपक्रम भविष्यातही राबविण्यात येणार आहेत
अधिक माहितीसाठी अमृत जिल्हा व्यवस्थापक श्री. जिग्रेश कमानी यांच्याशी
संपर्क साधावा: ९११२२२७६३७
पत्ता: जिल्हा कार्यालय, फ्लॅट नंबर ३०५, तिसरा मजला, बुलढाणा प्राईड बिल्डिंग,
तहसील कार्यालयासमोर, बुलढाणा - ४४३००१
00000
Comments
Post a Comment