‘सेवासंकल्प अभियान’ ; खामगाव तालुक्यात दोन दिवसीय आरोग्य कार्यशाळा उत्साहात संपन्न
बुलढाणा, दि. 14 (जिमाका) : सेवा
संकल्प अभियानांतर्गत राज्य शासनाच्या 'माझे गाव, आरोग्य संपन्न गाव' या महत्त्वाकांक्षी
अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या 'कस काय?' मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी, बोथाकाजी
व गणेशपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दि. १२ व १३ ऑक्टोबर २०२६ रोजी सर्वसमावेशक
प्राथमिक आरोग्य सेवा विषयावर दोन दिवसीय विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेचा
समारोप उत्साही वातावरणात पार पडला.
जिल्हा आरोग्य अधिकारी
डॉ. रणजीत मंडाले यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आणि सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी
डॉ. निलेश जाधव, जिल्हा प्रशिक्षण केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहा नलावडे
व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिलाष खंडारे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या कार्यशाळेचे
आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य
सेवक-सेविका, गटप्रवर्तक आणि आशा समन्वयक यांनी मोठ्या संख्येने व उत्स्फूर्त सहभाग
नोंदविला.
प्रशिक्षणादरम्यान उपस्थित
तज्ज्ञांनी 'कस काय?' मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी, सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा,
समुदायस्तरीय आरोग्य व्यवस्थापन आणि जनजागृती, आदर्श गृहभेट देण्याचे तंत्र, आरोग्याच्या
१३ सेवांचे सविस्तर प्रशिक्षण या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले:
तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून
डॉ. शैलेश खंडारे, डॉ. अंजली उजवने, डॉ. जीवन भारती, डॉ. पंकज राठोड, डॉ. मंगल राठोड,
डॉ. सचिन भांगे, डॉ. मिलिंद वानखेडे, डॉ. संतोष सांगळे, डॉ. शिवानंद शिंगाडे, डॉ. संतोष
साबळे, डॉ. सचिन खेडेकर, डॉ. सागर जाधव, डॉ. प्रवीण मुंडे तसेच आरोग्य सहाय्यिका कविता
खाडे, स्वाती शेंद्रे, कमल पदमने, आरोग्य सेविका सुनीता जवंजाळ आणि सुलोचना प-हाड यांनी
मोलाचे मार्गदर्शन केले.

Comments
Post a Comment