सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘तिशीचा पल्ला – तपासणी आणि सल्ला’ उपक्रमांतर्गत नागरिकांची आरोग्य तपासणी*
*सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘तिशीचा पल्ला – तपासणी आणि सल्ला’ उपक्रमांतर्गत नागरिकांची आरोग्य तपासणी*
*बुलढाणा, दि. ४ (जिमाका) :* सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘तिशीचा पल्ला – तपासणी आणि सल्ला’ या उपक्रमाद्वारे आयुष्यमान आरोग्य मंदिर, कोद्री अंतर्गत ३० वर्षे व त्यावरील नागरिकांची असंसर्गजन्य आजारांची (NCD) तपासणी करण्यात आली.
यावेळी नागरिकांची रक्तदाब, रक्तशर्करा, वजन तसेच आवश्यक आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. मधुमेह, उच्च रक्तदाब तसेच इतर असंसर्गजन्य आजारांपासून बचावासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि वेळोवेळी आरोग्य तपासणी करण्याबाबत नागरिकांना मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात आले.
उपकेंद्र सोनाळा अंतर्गत मौजे सालवान येथेही सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून लसीकरण तसेच ‘तिशीचा पल्ला – आरोग्य तपासणी आणि सल्ला’ व ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ या उपक्रमांतर्गत ३० वर्षे व त्यावरील महिला व पुरुषांची उच्च रक्तदाब, मधुमेह आणि कर्करोगासाठी तपासणी करण्यात आली. मोबाईल व्हॅनच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मारोडे यांनी नागरिकांची तपासणी करून आवश्यक औषधोपचार केले. त्यांच्या पथकाकडून हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली तसेच आवश्यक रक्तनमुने प्रयोगशाळा तपासणीसाठी घेण्यात आले.
यासोबतच गृहभेटी देऊन कंटेनर सर्वेक्षण, पाण्याच्या स्रोतांचे सर्वेक्षण व पाण्याची ओटी (OT) चाचणी करण्यात आली. संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांपासून प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत नागरिकांना आरोग्यविषयक शिक्षण देण्यात आले.
सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून गावपातळीवर नागरिकांची आरोग्य तपासणी, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि आरोग्यविषयक जनजागृतीला प्राधान्य देण्यात येत आहे.
0000
Comments
Post a Comment