खामगाव येथे ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत बालकांसाठी मोफत शल्यक्रिया शिबिर संपन्न

 




बुलढाणा, दि. 15 (जिमाका) :  'सेवा संकल्प अभियाना'च्या धर्तीवर राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK) अंतर्गत सामान्य रुग्णालय, खामगाव येथे बालकांसाठी विशेष मोफत शल्यक्रिया (सर्जरी) शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये टंग टाय (Tongue-tie), सिस्ट (Cyst) व इतर आरोग्यविषयक समस्यांनी ग्रस्त असलेल्या बालकांची मोफत तपासणी करून आवश्यक उपचारांची व शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

हे शिबिर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजीत मंडाले आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.  राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत बालकांमधील जन्माजात व्यंग, विकासात्मक अडचणी आणि विविध आजारांचे लवकर निदान करून त्यांच्यावर वेळेत मोफत उपचार करण्यावर भर दिला जातो. अशा शिबिरांमुळे गरजूंना वेळेवर वैद्यकीय मदत मिळून बालकांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते.

 बालकांना जीभ हलविण्यास, बोलताना किंवा खाण्या-पिण्यात अडचण येत असल्यास त्वरित लक्ष द्यावे. शरीरावर कोणतीही गाठ किंवा सूज आढळल्यास तात्काळ जवळच्या शासकीय आरोग्य संस्थेशी संपर्क साधावा. 'राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमा'चा अधिकाधिक पालकांनी लाभ घेऊन आपल्या बालकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने पालकांना केले आहे. 

000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या