समग्र प्राथमिक आरोग्य सेवा प्रशिक्षण कार्यशाळेची अधिकाऱ्यांकडून पाहणी ; *प्रशिक्षणाच्या गुणवत्तेचा घेतला आढावा; ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्य सेवा देण्यावर भर
बुलढाणा, दि. १२ (जिमाका)
: ग्रामीण
भागातील नागरिकांना त्यांच्या गावातच दर्जेदार, सर्वसमावेशक व सुलभ प्राथमिक आरोग्य
सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत समग्र प्राथमिक
आरोग्य सेवा (CPHC) प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. खामगाव येथे सुरू
असलेल्या या कार्यशाळेला आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, अटाळी तसेच संबंधित
आरोग्य यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन प्रशिक्षणाच्या कामकाजाची पाहणी केली.
या भेटीदरम्यान प्रशिक्षणार्थींना दिले जाणारे मार्गदर्शन, प्रशिक्षण
सत्रांचे नियोजन, प्रशिक्षणाची कार्यपद्धती आणि निर्धारित उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी
करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. प्रशिक्षणाचे नियोजन, सत्रांची अंमलबजावणी
आणि कार्यशाळेच्या आयोजनाबाबत उपस्थित अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. प्रशिक्षणाच्या
माध्यमातून आरोग्य कर्मचाऱ्यांचे ज्ञान व कौशल्य वृद्धिंगत करण्याच्या प्रयत्नांचेही
कौतुक करण्यात आले.
ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावातच सर्वसमावेशक प्राथमिक
आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण महत्त्वपूर्ण आहे.
प्रशिक्षणातून प्राप्त होणारे ज्ञान आणि कौशल्य यांचा प्रत्यक्ष आरोग्य सेवेत प्रभावी
वापर करून सेवा अधिक गुणवत्तापूर्ण, सक्षम व लोकाभिमुख कराव्यात, असे आवाहन यावेळी
करण्यात आले.
या प्रशिक्षण कार्यशाळेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. निलेश जाधव, डॉ.
शैलेश खंडारे, डॉ. संतोष, डॉ. शिवानी शिंदे, डॉ. संतोष साळवे, डॉ. सचिन भोंगे, डॉ.
मिलिंद बनबावणे, डॉ. सागर जाधव, डॉ. अनिल जवंजाळ, डॉ. पंकज राठोड, डॉ. मंगल राठोड,
डॉ. सचिन भांगे यांच्यासह अन्य वैद्यकीय अधिकारी व प्रशिक्षक सहभागी झाले. तसेच आरोग्य
सहाय्यिका कविता घाडे, स्वाती शेळके, सुवर्णा बेलसरे, सुनीता जनजाळ, सुलोचना पवार आणि
कमल पडघणे यांनी प्रशिक्षणाच्या आयोजनात व मार्गदर्शनात सहकार्य केले.
समग्र प्राथमिक आरोग्य सेवा प्रशिक्षणामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता
वाढण्यासोबतच ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक प्रभावी, सर्वसमावेशक व गुणवत्तापूर्ण
आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यास मदत होणार आहे.
0000
Comments
Post a Comment