सेवा संकल्प अभियानांतर्गत निंभोरा बुद्रुक येथे कुष्ठरोग शोध मोहीम ; लवकर निदान व उपचारासाठी घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी
बुलढाणा,
दि. ६ (जिमाका) : सेवा संकल्प
अभियानांतर्गत कुष्ठरोगाचे लवकर निदान करून तातडीने उपचार सुरू करणे तसेच रोगाचा प्रसार
रोखण्याच्या उद्देशाने जळगाव जामोद तालुक्यातील निंभोरा बुद्रुक येथे कुष्ठरोग शोध
व सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेदरम्यान आरोग्य पथकाने घरोघरी भेट देऊन
नागरिकांची तपासणी केली. कुष्ठरोगाची लक्षणे, लवकर निदानाचे महत्त्व तसेच वेळेत उपचार
घेतल्यास रोगावर नियंत्रण मिळविता येते, याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवदास कदम यांच्या आदेशानुसार,
डॉ. शकील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आरोग्य निरीक्षक जितेंद्र सदाशिव यांच्या निरीक्षणाखाली
आरोग्य सेवक सोपान माटे, आरोग्य सेवक प्रवीण टवलारकर आणि आशा सेविका पुष्पा वाघ यांनी
सर्वेक्षणात सक्रिय सहभाग घेतला.
“कुष्ठरोग
लपवू नका, वेळेत तपासणी करून उपचार घ्या,” असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले. कुष्ठरोगाचे
लवकर निदान, योग्य उपचार आणि नियमित उपचार यामुळे रोगाचा प्रसार रोखण्यास मदत होते.
नागरिकांनी कुष्ठरोगाची लक्षणे आढळल्यास जवळच्या शासकीय आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा,
असेही आवाहन करण्यात आले.
0000

Comments
Post a Comment