मोताळा येथे टीबी मुक्त भारत अभियानांतर्गत एक्स-रे तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

 


बुलढाणा दि.27 (जिमाका): माझे गाव आरोग्य संपन्न गाव अभियान तसेच टीबी मुक्त भारत अभियानाच्या १०० दिवसीय विशेष उपक्रम आणि कुष्ठरोग मोहिमेअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र बोराखेडी यांच्या वतीने मोताळा येथे जोखीमग्रस्त नागरिकांसाठी एक्स-रे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिरामध्ये Vulnerable Population अंतर्गत नागरिकांची क्षयरोग तपासणी करण्यात आली. उपस्थित नागरिकांना क्षयरोगाची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच उपलब्ध उपचार सेवांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी नागरिकांकडून टीबी मुक्त भारत प्रतिज्ञाही घेण्यात आली.

शिबिरादरम्यान एकूण १२४ लाभार्थ्यांची एक्स-रे तपासणी करण्यात आली असून या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

यावेळी नगर परिषद अध्यक्षा श्रीमती मधुरिताई देशमुख व नगर परिषद सदस्य श्री सचिन हिरोळे यांनी शिबिरास भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले.

सदर शिबिरात वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक थिगळे, समुदाय आरोग्य अधिकारी श्रीमती मिसाळ मॅडम, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक अमोल देशमुख, एक्स-रे टेक्निशियन श्री सुभाष राजपुत, आरोग्य निरीक्षक श्री पडघाण व श्री शिंदे, आरोग्यसेवक श्री शेळके, आरोग्यसेविका श्रीमती नेवगे मंगला गिरी, कोमल राठोड तसेच मोताळा येथील आशा सेविकांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

दरम्यान, दि. २४ मार्च २०२६ ते २५ मे २०२६ या कालावधीत राबविण्यात आलेल्या टीबी मुक्त भारत अभियानाच्या १०० दिवसीय विशेष कार्यक्रमांतर्गत बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात संशयित रुग्णांची एक्स-रे तपासणी करण्यात आली असून जिल्ह्यात एकूण २४ हजार २०६ एक्स-रे तपासण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत.

तालुकानिहाय एक्स-रे तपासणीमध्ये शेगाव (६२५७), संग्रामपूर (५१३९) व खामगाव (४०२९) हे तालुके आघाडीवर असून मोताळा तालुक्यातही अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. वर्षा गुट्टे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत विविध तपासणी शिबिरे, जनजागृती उपक्रम व वेळेवर उपचार सुविधा सातत्याने राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी यांनी दिली.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी