दिव्यांग मुला-मुलींसाठी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू; 30 जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
बुलढाणा, दि. 21 (जिमाका): दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे यांच्या मार्फत शासनमान्य
तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र, ता. देगलुर, जि. नांदेड येथे विविध व्यावसायिक
अभ्यासक्रमांसाठी दिव्यांग मुला-मुलींना प्रवेश देण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण परीक्षा मंडळ, मुंबई मान्यताप्राप्त अभ्यासक्रमांसाठी १८
ते ४० वयोगटातील अस्थिव्यंग, मुकबधीर, अंध व मतिमंद दिव्यांग विद्यार्थ्यांकडून अर्ज
मागविण्यात आले आहेत.
प्रशिक्षण केंद्रात विद्युत तारतंत्री,
इलेक्ट्रिक डोमेस्टिक उपकरणे दुरुस्ती व सर्व्हिसिंग, मोबाईल रिपेअरिंग अँड सर्व्हिसिंग,
फिटर, एलिमेंट ऑफ कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर ऑपरेशन विथ एम.एस. ऑफिस, डेस्कटॉप
पब्लिशिंग (DTP), कॉम्प्युटर अकाउंटिंग व ऑफिस ऑटोमेशन तसेच अगरबत्ती, खडू व धूपनिर्मिती
यांसारखे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
इच्छुक दिव्यांग विद्यार्थी किंवा
त्यांच्या पालकांनी दि. ३० जून २०२६ पर्यंत प्राचार्य, तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण
केंद्र, देगलुर, जि. नांदेड येथे अर्ज पाठवावेत किंवा समक्ष भेट द्यावी, असे आवाहन
करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र, भायेगाव रोड,
देगलुर, ता. देगलुर, जि. नांदेड येथे किंवा मो.क्रमांकावर 9960900369 / 9403207100
/ 7378641136 संपर्क साधावा.
000000
Comments
Post a Comment