महिला व चिमुकला बेपत्ता; धाड पोलिसांकडे मिसिंग दाखल

 



बुलढाणा, दि. 6 (जिमाका) : धाड पोलीस स्टेशन अंतर्गत चांडोळ येथील विवाहित महिला व तिचा दोन वर्षीय मुलगा बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी धाड पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग क्रमांक ०४/२०२६ अन्वये नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सचिन सुनिल देशमुख (वय ३६, रा. चांडोळ ता. जि. बुलडाणा) यांनी २३ एप्रिल २०२६ रोजी धाड पोलीस स्टेशनमध्ये हजर राहून तक्रार दिली. त्यांची पत्नी सौ. वैशाली सचिन देशमुख (वय २४) या १८ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १२ वाजल्यानंतर पांग्री येथील नातेवाईकांकडे ठेवलेले सामान आणण्यासाठी जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडल्या होत्या. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा श्री सचिन देशमुख (वय २ वर्ष) हाही होता.

संध्याकाळपर्यंत त्या घरी परत न आल्याने नातेवाईक व परिसरात शोध घेण्यात आला. मात्र, दोघांचाही ठावठिकाणा लागला नसल्याने अखेर धाड पोलीस स्टेशनमध्ये मिसिंगची नोंद करण्यात आली.

हरविलेल्या महिलेचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे : उंची अंदाजे ५.५ फूट, रंग गोरा, केस काळे व वाढलेले.

या महिला व बालकाबाबत कोणास काही माहिती मिळाल्यास धाड पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास चौकशी अधिकारी शांताराम जाधव, सहायक फौजदार, पोलीस स्टेशन धाड हे करीत आहेत.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या