जिल्हा परिषद अनुकंपाधारक उमेदवारांची तात्पुरती सुधारीत प्रतीक्षायादी प्रसिद्ध

 


बुलढाणा दि.29 (जिमाका): जिल्हा परिषद बुलडाणा अंतर्गत सन 2026 ची अनुकंपाधारक उमेदवारांची तात्पुरती सुधारीत प्रतीक्षायादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही यादी या कार्यालयाचे पत्र क्र. बुजिप/साप्रवि/आस्था-4/1703/2026 दिनांक 26 मे 2026 नुसार जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सदर तात्पुरत्या ज्येष्ठता यादीबाबत संबंधित उमेदवारांकडून दिनांक 5 जून 2026 पर्यंत लेखी आक्षेप मागविण्यात आले आहेत. यादीमध्ये काही त्रुटी, हरकती अथवा आक्षेप असल्यास ते विहित मुदतीत लेखी स्वरूपात संबंधित कार्यालयात सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्राप्त आक्षेपांची पडताळणी करून अनुकंपाधारक उमेदवारांची अंतिम प्रतीक्षायादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे सर्व संबंधित उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या