माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानाला बुलढाण्यात उत्स्फूर्त प्रतिसाद; जिल्ह्यातील 870 ग्रामपंचायतींचा सक्रिय सहभाग

 


 

बुलढाणा, दि. 15 (जिमाका):  ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य अधिक सक्षम व निरोगी करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या माझं गाव आरोग्य संपन्न गाव या अभियानाला बुलढाणा जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील एकूण 870 ग्रामपंचायतींनी या अभियानात सहभाग नोंदवून आरोग्यदायी गाव उभारण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

 

या अभियानांतर्गत गावपातळीवर स्वच्छता, सुरक्षित पिण्याचे पाणी, लसीकरण, माता-बाल आरोग्य, संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोग प्रतिबंध, कुपोषण निर्मूलन, तंबाखूमुक्त परिसर, नियमित आरोग्य तपासणी तसेच जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत.

 

ग्रामपंचायत, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी तसेच ग्रामस्थ यांच्या सक्रिय सहभागामुळे अभियानाला अधिक गती मिळाली आहे. गावांमध्ये आरोग्य विषयक स्पर्धा, स्वच्छता मोहिम, रक्तदाब व मधुमेह तपासणी, पोषण जनजागृती, शाळांमधील आरोग्य शिक्षण तसेच पर्यावरण संवर्धन उपक्रमही आयोजित करण्यात येत आहेत.

 

निरोगी गाव – समृद्ध गाव हा संदेश नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचे कार्य अभियानातून सुरू असून जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागात आरोग्याबाबत सकारात्मक वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढत असून उर्वरित गावांनीही अभियानात सहभागी होऊन आरोग्य संपन्न गाव घडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या