तृतीयपंथीयांसाठी बीजभांडवल योजना;३० मेपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन स्वयंरोजगारासाठी कर्ज उपलब्ध

 


 

बुलढाणा, दि. 18 (जिमाका): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत महाराष्ट्र राज्यातील किमान दहा वर्षे वास्तव्यास असलेल्या तृतीयपंथीय व्यक्तींच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक विकासासाठी राज्य शासनाने बीजभांडवल योजना मंजूर केली आहे. या योजनेअंतर्गत तृतीयपंथीयांना स्वयंरोजगार व व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

 

योजनेअंतर्गत भाजी स्टॉल, चहा-स्नॅक्स सेंटर, झेरॉक्स-लॅमिनेशन सेंटर, फ्रुट स्टॉल, पिठाची गिरणी, कापडी पिशव्या तयार करणे, जनरल स्टोअर्स, स्टेशनरी शॉप, मालवाहतूक टेम्पो, आईसक्रिम फॅक्टरी, वडा-पाव व ज्युस सेंटर, बेकरी व्यवसाय, बांगडी दुकान, बटाटा वेफर्स निर्मिती, ब्युटी पार्लर, सलून, चिकन-मासे विक्री केंद्र, मोबाईल शॉपी, मसाले तयार करणे तसेच लाँड्री व्यवसायासाठी कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच प्रशिक्षित तृतीयपंथीय व्यक्तींना प्लंबर, फ्रिज दुरुस्ती, इलेक्ट्रिशियन, टीव्ही दुरुस्ती, मोबाईल दुरुस्ती, स्मार्ट खेळणी तयार करणे, ए.सी. दुरुस्ती, गॅस शेगडी दुरुस्ती, घरगुती उपकरणे दुरुस्ती, वॉटर हिटर, गिझर व वॉटर फिल्टर दुरुस्ती यांसाठी आवश्यक साधनसंच खरेदीकरिता देखील कर्ज उपलब्ध होणार आहे.

 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक तृतीयपंथीय व्यक्तींनी सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालय, बुलढाणा येथे अर्ज प्राप्त करून तो दि. ३० मे २०२६ पर्यंत सादर करावा, असे आवाहन समाजकल्याण सहाय्यक आयुक्त मनोज मेरत यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या