पिक प्रात्यक्षिके व प्रमाणित बियाणे वितरणासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू; महाडीबीटी प्रणालीवर अर्ज करण्याचे आवाहन

 


बुलढाणा दि.21 (जिमाका): राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान अंतर्गत अन्नधान्य पिके, भरडधान्य (मका), पौष्टिक तृणधान्य (श्री अन्न) तसेच कडधान्य आत्मनिर्भर अभियान सन 2026-27 अंतर्गत पिक प्रात्यक्षिके व प्रमाणित बियाणे वितरण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत पीक प्रात्यक्षिक गटांचे अर्ज तसेच प्रमाणित बियाणे वितरणासाठी शेतकऱ्यांनी महा-डीबीटी प्रणालीद्वारे ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मका, पौष्टिक तृणधान्य, तूर, मुग व उडीद या पिकांसाठी इच्छुक शेतकरी बांधवांनी mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावेत. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर अर्ज स्वीकृत करण्यात येणार असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी तात्काळ ऑनलाईन अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी संतोष डाबरे यांनी केले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या

गटई कामगारांसाठी पत्र्याचे स्टॉल देण्याची योजना; २० फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन