चिखली येथील शासकीय वसतिगृहात ऑनलाईन प्रवेश सुरू; 30 जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
बुलढाणा दि.29 (जिमाका):
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, बुलढाणा अधिनस्त क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले
शासकीय वसतिगृह, चिखली येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू
झाली आहे. प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांनी 30 जूनपर्यंत अर्ज करावे, असे आवाहन वसतीगृहाचे
गृहपाल पी. टी. राठोड यांनी केले आहे.
मागासवर्गीय प्रवर्गनिहाय आरक्षित टक्केवारीनुसार
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, विशेष मागास प्रवर्ग, अपंग
तसेच इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. चिखली नगर परिषद हद्दीतील
शाळा, विद्यालय व महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांनी प्रवेश
अर्ज भरावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रवेश अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार
असून विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org या पोर्टलवर जाऊन अर्ज भरावेत. अर्ज
भरल्यानंतर त्याची हार्ड कॉपी वसतिगृहात जमा करणे आवश्यक राहणार आहे.
शालेय
अभ्यासक्रमासाठी प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख 30 जून 2026 असून प्रवेशित विद्यार्थ्यांची
पहिली यादी ७ जुलै २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच इयत्ता 11 वी ते 12
वी व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जुलै 2026 असून
पहिली यादी 22 जुलै 2026 रोजी जाहीर केली जाणार
आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी
9503228682 या क्रमांकावर संपर्क साधावा.
00000
Comments
Post a Comment