अनोळखी इसमाचा मृत्यू; ओळखणाऱ्यांनी संपर्क करण्याचे आवाहन

 



बुलढाणा, दि. 21 (जिमाका): पोलीस स्टेशन, बुलढाणा ग्रामीण परिसरातील अनोळखी मृत व्यक्ती हा अंदाजे 50 वर्षीय पुरुष असून तो दिव्य प्रकल्प आश्रम, वरवंड येथे वास्तव्यास होता. संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला असून दिव्य सेवा प्रकल्प आश्रमाचे संचालक अशोक काकडे यांनी दिलेल्या माहितीनुसार मृत व्यक्ती अनोळखी व बेवारस असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचा पत्ता दिव्या फाऊंडेशन, वरवंड, ता. जि. बुलडाणा असा नमूद करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस स्टेशन येथे मर्ग क्रमांक २५/२०२६ कलम १९४ भा.ना.सु.सं. अंतर्गत अनोळखी मृत व्यक्तीची नोंद करण्यात आली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. कक्षसेवक यांच्या रिपोर्टवरून ही कारवाई करण्यात आली आहे.

मृत व्यक्तीची ओळख पटवून त्याच्या नातेवाईकांचा शोध लागावा यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. संबंधित व्यक्तीबाबत कोणास काही माहिती असल्यास तपासी अधिकारी पोहेकॉ कैलास ऊगले ८८८८८११७१४ / ८८३०२६५२१४ यांच्याशी संपर्क साधावा.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या

गटई कामगारांसाठी पत्र्याचे स्टॉल देण्याची योजना; २० फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन