नवीन कामगार संहितांवरील मसुद्याबाबत हरकती व सूचना मागविल्या

 


बुलढाणा दि.26 (जिमाका): भारत सरकारने दि. २१ डिसेंबर २०२५ पासून नवीन चार कामगार संहिता (Labour Codes) अंमलात आणल्या आहेत. त्याअनुषंगाने राज्य शासनाने औद्योगिक संबंध संहिता-२०२०, वेतन संहिता-२०१९, व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य व कामाची स्थिती संहिता-२०२० तसेच सामाजिक सुरक्षा संहिता-२०२० या संहितांचे मसुदे अधिसूचनेद्वारे दि. २८ एप्रिल २०२६ रोजी प्रसिद्ध केले आहेत.

या मसुद्यांबाबत औद्योगिक क्षेत्रातील कामगार संघटना, मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन, दुकाने व आस्थापना, मालक संघटना तसेच संबंधित घटकांनी आपल्या हरकती अथवा सूचना दि. १२ जून २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी सादर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

हरकती अथवा सूचना कामगार आयुक्त, कामगार भवन, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई – ४०० ०५१ या पत्त्यावर पाठवाव्यात. तसेच mh.labourcodes@gmail.com या ई-मेल आयडीवरही सूचना पाठविता येणार आहेत.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या

गटई कामगारांसाठी पत्र्याचे स्टॉल देण्याची योजना; २० फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन