महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ बुलडाणा विभागात शिकाऊ उमेदवार भरती प्रक्रिया सुरु

 


बुलढाणा दि.8 (जिमाका): महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (रा.प.) बुलडाणा विभागातर्फे सत्र २०२६-२७ करीता तांत्रिक व्यावसायिक व आयटीआय उत्तीर्ण शिकाऊ उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी करून अर्ज करण्याचे आवाहन विभाग नियंत्रक, रा.प. बुलडाणा विभाग यांच्या वतीने करण्यात आले आहे.

या भरती प्रक्रियेत विविध व्यवसायांकरिता पदे उपलब्ध असून त्यामध्ये मेकॅनिक मोटार व्हेईकल (MMV) – ४० पदे, मेकॅनिक डिझेल – १४ पदे, मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर (MVBB) – १३ पदे, इलेक्ट्रीशियन – १४ पदे, पेंटर – ०४ पदे, टर्नर – ०२ पदे, वेल्डर – ०५ पदे, वायरमन – ०३ पदे तसेच मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग – ०५ पदांचा समावेश आहे.

उमेदवारांनी संबंधित व्यवसायातील आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अर्जदारांची वयोमर्यादा १८ ते ३८ वर्षे ठेवण्यात आली आहे.

शिकाऊ उमेदवारीसाठी इच्छुक उमेदवारांनी प्रथम www.apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी (Registration) करणे अनिवार्य आहे. त्यानंतर पोर्टलवरील सूचनांनुसार M.S.R.T.C. BULDANA DIVISION या आस्थापनेसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.

ऑनलाईन नोंदणी केलेल्या उमेदवारांना विभागीय कार्यालय, मलकापूर रोड, बुलडाणा येथील आस्थापना शाखेमधून छापील अर्ज दिनांक १३ मे २०२६ ते २२ मे २०२६ या कालावधीत सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत उपलब्ध करून देण्यात येतील. भरलेले अर्ज त्याच ठिकाणी स्वीकारण्यात येणार आहेत.

अर्ज शुल्क जीएसटीसह खुल्या प्रवर्गासाठी ५९० रुपये तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी २९५ रुपये ठेवण्यात आले आहे. शुल्क M.S.R.T.C. FUND A/C BULDANA या नावाने राष्ट्रीयकृत बँकेचा डिमांड ड्राफ्टद्वारे भरावे लागणार आहे. आवश्यक कागदपत्रांसह पूर्ण अर्ज दिनांक २२ मे २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत सादर करणे बंधनकारक आहे.

फक्त apprenticeshipindia.org पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी केलेल्या उमेदवारांनाच रा.प. महामंडळ बुलडाणा विभागात शिकाऊ उमेदवार म्हणून संधी दिली जाणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना