शासकीय निवासी शाळा कोलवड येथे प्रवेश प्रक्रिया सुरू

 


बुलढाणा, दि. 6 (जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या अनुसूचित जाती मुलांची शासकीय निवासी शाळा, कोलवड ता. जि. बुलढाणा येथे शैक्षणिक सत्र २०२६-२७ करीता प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सामाजिक आरक्षणानुसार इयत्ता ६ वी ते १० वीतील विद्यार्थ्यांना रिक्त जागांवर प्रवेश देण्यात येणार आहे.

सदर निवासी शाळा ही पूर्णतः शासकीय असून विद्यार्थ्यांना निवास, भोजन, गणवेश, पाठ्यपुस्तके, स्टेशनरी तसेच इतर आवश्यक सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्या जातात.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजाभज, विमाप्र तसेच दिव्यांग प्रवर्गातील पात्र व इच्छुक विद्यार्थी व पालकांनी प्रवेशासाठी सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, बुलढाणा तसेच अनुसूचित जाती मुलांची शासकीय निवासी शाळा, कोलवड येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण बुलढाणा श्री. मनोज मेरत आणि मुख्याध्यापक श्री. एस. व्ही. पहुरकर यांनी केले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या

गटई कामगारांसाठी पत्र्याचे स्टॉल देण्याची योजना; २० फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन