केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन

 




बुलढाणा, दि. 14 (जिमाका) : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौक परिसरात उत्साहपूर्ण वातावरणात जन्मोत्सव सोहळा पार पडला. यावेळी केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

 

बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौक येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक उभारण्यात आले असून, आज सकाळी पारंपरिक पद्धतीने जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पंचामृताने अभिषेक करण्यात आला. तसेच एका बालकाला संभाजी महाराजांच्या रूपात पाळण्यात ठेवून सुवासिनींनी पाळणागीत गायले व त्याचे ‘संभाजी राजे’ असे नामकरण करण्यात आले.यानंतर केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी स्मारकातील पुतळ्यास पुष्पमाल्य अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमास आमदार संजय गायकवाड, नगराध्यक्षा पूजाताई गायकवाड, नगर परिषदेचे गटनेते मृत्युजय गायकवाड, ओमसिंग राजपूत, सोनू जाधव यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या