26 मेपासून अकोला येथे जी.डी.सी.अँड ए व सी.एच.एम. परीक्षा

 


बुलढाणा दि.26 (जिमाका): महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या गव्हर्नमेंट डिप्लोमा इन को-ऑपरेशन अँड अकाऊंटन्सी (जी.डी.सी. अँड ए.) तसेच सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (सी.एच.एम.) परीक्षा मे-२०२६ संदर्भातील अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

 

या परीक्षेसाठी अकोला, वाशिम व बुलढाणा जिल्ह्यातील एकूण १९१ परीक्षार्थी सहभागी होणार आहेत. सदर परीक्षा दि. २६, २७ व २८ मे २०२६ रोजी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अकोला यांच्या मार्फत घेण्यात येणार आहे.

 

जी.डी.सी. अँड ए. व सी.एच.एम. परीक्षा २०२६ साठी अकोला-२३ या परीक्षा केंद्राचा पत्ता खंडेलवाल ज्ञानमंदिर स्कूल, श्री इंदिरादेवी मोहनलाल खंडेलवाल मेमोरियल हायस्कूल, विजय मिडलक्लास हाऊसिंग सोसायटी, गोरक्षण रोड, अकोला असा आहे. परीक्षेची वेळ सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत तसेच दुपारी २ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत राहणार आहे.

 

ज्या परीक्षार्थ्यांना तांत्रिक अडचणीमुळे प्रवेशपत्र डाउनलोड करता आलेले नाही, त्यांनी परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी किमान एक तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे. मुख्यालयाकडून प्राप्त उपस्थिती पत्रक व परीक्षार्थ्यांच्या छायाचित्र असलेल्या ओळखपत्राच्या पडताळणीनंतर त्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात येणार असल्याचे प्रशासनाने कळविले आहे. तरी सर्व परीक्षार्थ्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक जी.पी. साबळे यांनी केले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या